

अदिवी शेषच्या आगामी ‘डकैट’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’ आणि यशचा ‘टॉक्सिक’ या दोन मोठ्या चित्रपटांशी बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. नव्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
Adivi Sesh's film Dacoit Postponed
दाक्षिणात्य अभिनेता अदिवी शेष आणि मृणाल ठाकुरचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘डकैट’ (Dacoit) सध्या चर्चेत आहे, मात्र चाहत्यांसाठी थोडी निराशाजनक बातमी समोर आली आहे. या चित्रपटाची ठरलेली रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे बॉक्स ऑफिसवर होणारा मोठा क्लॅश.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर २’ आणि केजीएफ स्टार यशचा ‘टॉक्सिक द मुव्ही’ हे दोन्ही चित्रपट जवळपास एकाच कालावधीत प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. हे दोन्ही बिग बजेट आणि प्रचंड क्रेझ असलेले चित्रपट असल्यामुळे ‘डकैट’साठी अडसर ठरले आहेत. त्यामुळे अदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांच्या 'डकैत' चित्रपटाची प्रदर्शनाच्या नव्या तारखेची प्रतीक्षा फॅन्सना लागून राहिली आहे.
रणवीर सिंगचा 'धुरंधर: द रिव्हेंज' आणि यशचा 'टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स' हे चित्रपट १९ मार्चला एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांचा 'डकैत' चित्रपट त्याच तारखेला प्रदर्शित होणार होता,. पण बॉक्स ऑफिसवरील क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांनी डकैतची तारीख पुढे ढकलली आहे.
'डकैत' चित्रपटाची तारीख ठरली
'डकैत'च्या निर्मात्यांनी नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून १० एप्रिलला प्रदर्शित होईल. दिग्दर्शक शनेल देव यांचे या चित्रपटातून पदार्पण आहे. आदिवी शेष एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा प्रेमींभोवती फिरते. दोघेही एकत्र येऊन दरोडे टाकत अशतात. ही मालिका सातत्याने सुरु राहते, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलते. या चित्रपटात प्रकाश राज आणि अनुराग कश्यप यांच्या देखील भूमिका आहेत.
क्लॅश: धुरंधर-द रिव्हेंज विरुद्ध टॉक्सिक
रणवीर सिंहचा 'धुरंधर-२' आणि यशचा टॉक्सिक आता एकाच दिवशी मोठ्या पडद्यावर येणार असल्याने त्यांच्यात टक्कर पाहायला मिळणार आहे. दोघेही तगडे कलाकार आणि फॅन्सची क्रेझही ततिकीच. त्यामुळे दोन्ही अभिनेती कसा आमना सामना करणार, याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.