Bigg Boss Marathi 6 | ‘बिग बॉस मराठी’ हा ‘Scripted शो’ नाही, रितेशने राखी-संकेतला ऐकवलं

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh | ‘बिग बॉस मराठी’ हा ‘Scripted शो’ नाही, रितेशने राखी-संकेतला ऐकवलं
Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 latest updates instagram
Published on
Updated on
Summary

लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi स्क्रिप्टेड असल्याच्या चर्चांवर शोचा होस्ट रितेश देशमुखने स्पष्ट प्रतिक्रिया दिली. राखी सावंत आणि संकेत पाठक यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी उत्तर देत हा शो स्क्रिप्टेड नसल्याचे सांगितले.

Bigg Boss Marathi 6 updates news

लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी नेहमीच वाद आणि चर्चांमुळे प्रसिद्ध असतो. अलीकडेच या शोबाबत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. घरातील काही सदस्यांनी हा शो स्क्रिप्टेड असल्याचा आरोप केला होता. मात्र या आरोपांवर शोचा होस्ट रितेश देशमुखने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंत आणि संकेत पाठक यांनी शोबाबत काही वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. काही चाहत्यांनीही या शोबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना रितेश देशमुख म्हणाला की, ‘बिग बॉस मराठी’ हा स्क्रिप्टेड शो नाही. या शोमध्ये घडणाऱ्या घटना आणि स्पर्धकांचे वागणे हे त्यांच्या स्वतःच्या निर्णयांवर आधारित असते. त्यामुळे हा शो स्क्रिप्टेड असल्याचे आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बिग बॉसचा गेम स्क्रिप्टेड नाही. बिग बॉस घरातील सदस्यांना काय बोलायचं किंवा कसं वागायचं याच्या सूचना देत नाही. पण त्याचवेळी बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी गेम प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, गटबाजी, खेळाची बदलती समीकरणं हा एक खेळाचा भाग असल्याचं तो म्हणाला. घरातील प्रत्येक सदस्य इतरांच्या हालचालींवर लक्ष ठेवत स्वतःची रणनीती आखत असतो. त्यामुळे कुठलीही स्क्रिप्ट नाही.

Bigg Boss Marathi 6
Youtuber Anurag Dobhal big health update | भीषण अपघातानंतर आयसीयुमध्ये ‘UK07 Rider’, मॅनेजरनी दिली महत्त्वाची माहिती

यावेळी संकेत आणि राकी यांच्यातील नाट्यमय संवाद देखील रितेशने बोलून दाखवला. 'मी काही करते तू पाणी फेक माझ्यावरती...पाणी फेकायच, रागात यायची ॲक्चिंग करता हा राखी सावंत शो नाहीये...यानंतर राखी म्हमाली माझी चुकी झाली...पण रितेश तिला मध्येच थांबवतो...'

आता घरातील गटांच्या समीकरणांमध्येही बदल होताना दिसताहेत. ‘टोळी’ आणि ‘काटा’ अशा गटांची चर्चा आधीपासूनच सुरू असताना आता वाईल्ड कार्ड सदस्यांच्या आगमनानंतर घरातील नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi 6
Aamir Khan | त्या काळात प्रमोशनसाठी साधने नव्हती..खुद्द आमिर-जुहीने रस्त्यावर उतरून वाटले होते 'कयामत से कयामत तक'चे पोस्टर्स

दुसरीकडे, रितेशने राकेश बापटलाही सुनावलं. रितेश म्हणाला-'राकेश, तुमची एक हिस्ट्री आहे..तुम्ही टास्क रद्द करता..खेळायचं नाही तर जाऊ नका...राकेश तुम्ही जे काही केलं..त्यावर लोकांनी प्रतिक्रिया कशाप्रकारे दिलीय पहा. तुम्हाला कॉमेंट्स देखील दाखवतो...'

आता आठवड्याच्या शेवटी घरच्या पत्रांनी कोणत्या सदस्यांनी नॉमिनेट करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news