Karan Sonawane Post: बिग बॉस मराठीतून बाहेर पडताच करण सोनावणे काय म्हणाला? पोस्टने वाढवली उत्सुकता

Bigg Boss Marathi 6 Double Eviction: Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर पडल्यानंतर करण सोनावणेने पहिली पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…” या एका ओळीने त्याने पुढील प्लॅनबाबत उत्सुकता वाढवली आहे.
Karan Sonawane Post Bigg Boss
Karan Sonawane Post Bigg Boss Pudhari
Published on
Updated on

Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane Journey Ends: बिग बॉस मराठीच्या घरात काल अचानक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. डबल एविक्शनमुळे प्रेक्षकांना जोरदार धक्का बसला. आयुष संजीव आणि करण सोनावणे या दोघांचा प्रवास एकाच दिवशी संपला. आठवड्याच्या सुरुवातीलाच रितेश देशमुखने दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्याचे संकेत दिले होते आणि प्रत्यक्षात तसचं घडलं.

करण सोनावणे हा घरातील धडाकेबाज स्पर्धक मानला जात होता. टास्कमध्ये त्याची मेहनत दिसत होती, प्रेक्षकांचाही चांगला पाठिंबा होता. पण अखेर कमी मतांमुळे करणला शो सोडावा लागला.

Karan Sonawane Post Bigg Boss
Viral Teacher Dance | स्नेहसंमेलनात शिक्षिकेची पावले थिरकली ‘मुकाबला’ गाण्यावरः प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्टया, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक!

घरातून बाहेर पडताच करणने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली. बिग बॉसच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ टाकत त्याने लिहिलं “भाऊचा फायनल धक्का… माझा बिग बॉसचा प्रवास इथेच थांबतोय. यंदा ट्रॉफी ठाण्याला येत नाही. पण तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. मॅजिकवर विश्वास ठेवूया.”

या पोस्टमधून करणने आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या. मात्र काही वेळातच त्याने आणखी एक स्टोरी टाकली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या स्टोरीत फक्त एक ओळ होती.

“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…” या एका वाक्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. कारण पुढे काय होणार? एखादा नवा प्रोजेक्ट येणार? मोठी घोषणा होणार? की बिग बॉसमध्ये परत जाणार? याबाबत सध्या फक्त चर्चाच सुरू आहेत.

Karan Sonawane
Karan Sonawane Pudhari
image-fallback
‘रात्रीस खेळ चाले २’चा निरोप; अण्णांची शेवंता झाली भावूक… 
Karan Sonawane
Karan Sonawane Pudhari

करण सोनावणे कोण आहे?

सोशल मीडियावर Focus Indian या नावाने करण ओळखला जातो. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला करण स्वतःच्या मेहनतीवर इथपर्यंत पोहोचला आहे. त्याचे रिल्स, मजेशीर व्हिडीओ आणि क्रिकेटशी संबंधित कंटेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

IPL सामने असोत किंवा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत केलेले रिल्स. करणचा वेगळा अंदाज चाहत्यांना आवडतोय. आता बिग बॉसचा अध्याय संपला असला, तरी करणने दिलेला “पिक्चर अभी बाकी है” चा इशारा नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news