बिग बॉसच्या फॅन्सना सगळ्यात जास्त आतुरता असते ती बिग बॉस च्या वीकएंडच्या वारची. शनिवारी येणारा होस्ट सलमान खान प्रत्येक स्पर्धकाची कशाप्रकारे खरडपट्टी काढतो हे पाहणे अधिक रंजक ठरते. तसेच या आठवड्याच्या शेवटी कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार याचीही उत्सुकता चाहत्यांना असते. (Latest Entertainment News)
या आठवड्यात प्रणीत मोरे, गौरव खन्ना, मृदुल तिवारी, आवेज दरबार, अशनूर कौर आणि निलम गिरी हे नॉमिनेट झाले आहेत. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरियोग्राफर आवेज दरबार हा या आठवड्यात घरातून बाहेर पडला आहे. खरे तर आवेजला या घरातील तगडा प्रतिस्पर्धी मानले जात होते. पण पुरेसे व्होट न मिळाल्याने आवेज यावेळी घरातून बाहेर पडला आहे.
आवेजने प्रत्येक आठवड्यासाठी 6 लाख मानधन घेतले आहे. म्हणजे या शोमधून त्याने जवळपास 30 लाख रुपये कमावले आहेत
बिग बॉसची माजी विजेती गौहर खानने यावेळी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली. दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर गौहर पहिल्यांदाच स्क्रीनला सामोरे जाताना दिसणार आहे. यावेळी तिने घरच्या सदस्यांना योग्य भाषेचा वापर करण्यासंबंधी सांगितले.
वीकएंड का वारला होस्ट सलमानने बासीर आली आणि अमाल मलिक यांना चांगले फटकारले. प्रणीतसोबत झालेल्या वादानंतर सलमानची ही प्रतिक्रिया होती.