BB-19 Tanya Mittal | महाकुंभमधून व्हायरल झाली होती तान्या मित्तल; आता बिग बॉसच्या घरात घेतला मोठा निर्णय

BB-19 Tanya Mittal | सोशल मीडिया सेन्सेशन तान्या मित्तलचा मोठा निर्णय; बिग बॉसच्या घरात 'या' खास गोष्टींसह
IMAGE OF Tanya Mittal
Bigg Boss-19 Tanya Mittal Instagram
Published on
Updated on

tanya mittal in Bigg Boss-19 house

मुंबई - बिग बॉस-१९ मध्ये रविवारी सलमान खानने सूत्रसंचालनाला सुरुवात केली आणि एका शानदार प्रीमियर एपिसोडद्वारे स्पर्धकांची ओळख करून दिली. बिग बॉस सीझन १९ चा प्रवास अधिकृतपणे आता सुरू झाला. आता प्रभावशाली सोशल मीडिया सेन्सेशन आणि उद्योजिका तान्या मित्तलने बिग बॉसच्या घरात येताना मोठा निर्णय घेतला.

बिग बॉस १९ ची तान्या मित्तल ८०० साड्या घेऊन रिअॅलिटी शोमध्ये प्रवेश करते. आणि ती म्हणते की 'प्रत्येक दिवसासाठी मी ३ साड्या नेसण्याचा निर्णय घेतला आहे.'

IMAGE OF Tanya Mittal
Govinda: बाप्पासमोरच घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम, गोविंदा-सुनितांचा व्हिडिओ व्हायरल

तान्या काय म्हणाली?

तिच्या या निर्णयाबद्दल बोलताना तान्या म्हणाली, "मी माझ्या सुखसोयी मागे सोडत नाहीये, मी माझे दागिने, अॅक्सेसरीज आणि ८०० हून अधिक साड्या घरात घेऊन जात आहे. दररोज, मी ३ साड्या ठरवल्या आहेत, ज्या मी दिवसभर बदलत राहीन."

कोण आहे तान्या मित्तल?

तान्या ही २६ वर्षांची आहे. ती सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर आणि उद्योजिका आहे. तान्याची संपत्ती २ कोटी रु. सांगितली आहे.

IMAGE OF Tanya Mittal
Govinda: बाप्पासमोरच घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम, गोविंदा-सुनितांचा व्हिडिओ व्हायरल

'हे' आहेत बिग बॉस सीझन १९ चे स्पर्धक

सलमानने गेल्या रविवारी ग्रँड प्रीमियरमध्ये बिग बॉस १९ च्या स्पर्धकांची ओळख करून दिली. स्पर्धकांमध्ये अशनूर कौर, झैशान कादरी, बसीर अली, गौरव खन्ना, नतालिया जानोस्झेक, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, नीलम गिरी, कुनिका सुदानंद, अमाल मल्लिक, नगमा मिराजकर, अवेज दरबार, नेहल चुडासमा, अभिषेक बजाज, मृदुल तिवारी यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news