

Govinda sunita ahuja spot together during divorce rumour
मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. याबद्दल रोज काही ना काही अपडेट्स समोर येत असताना आता घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोविंदा आणि सुनीता एकत्र स्पॉट झाले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली. शिवाय अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तरही दिलं. घटस्फोटाबद्दल खुद्द सुनीता काय म्हणाल्या?
यंदा गणपती बाप्पांचे स्वागत करताना गोविंदा-सुनिता यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघे डार्क मरून ब्राऊन कलर आऊटफिटमध्ये दिसत होते. सुनिता यांनी साडी नेसली होती तर गोविंदा यांनी शेरवानी परिधान केली होती. दोघेही एकत्र कॅमेराबद्ध झाले, त्यामुळे घटस्फोटांच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.
सुनिता आहुजा यांनी माध्यमांना सांगितलं की, ''आमच्यात काही बिनसलं असतं तर आमच्यामध्ये दुरावा असता. आम्ही इतके जवळ नसतो. आज तुम्ही पाहिला आहात. कुणीही आम्हाला वेगळं करू शकत नाही. मेरा पती सिर्फ मेरा है, मेरा गोविंदा सिर्फ मेरा है..प्रथम देवता आहे गणपती..जे काही चांगलं होणार आहे त्याच्या आशीर्वादाने. सर्व जण उत्सव साजरा करा, आनंदोत्सव साजरा करा. जोपर्यंत आम्ही स्वत: काही बोलत नाही, तोपर्यंत कृपया काहीही आमच्याबद्दल बोलू नका.'' तर गोविंदा यांनी गणपती बाप्पाचा जयघोष कॅमेरासमोर करत आनंदोत्सव साजरा केला.
सुनिता पुढे म्हणाल्या, "जेव्हा गोविंदाच्या कारकिर्दीत प्रगती होत होती, तेव्हा त्याने त्याच्या ऑफिसमध्ये गणपती ठेवण्याची परंपरा सुरू केली. यशवर्धनच्या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या महिन्यात सुरू होत आहे, म्हणून मी म्हणाले की, यावेळी माझा मुलगा गणपती घेऊन येईल. मला वाटते की, त्याने गोविंदाप्रमाणेच सर्वांकडून खूप प्रसिद्धी, आदर आणि प्रेम मिळवावे. म्हणूनच मी यशवर्धनला यावेळी 'गणपती स्थापना' करायला लावले."
मागील काही दिवसांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या वृत्तांना जोर पकडला आहे. सुनीता यांच्या यूट्यूब व्लॉग नंतर दोघांचे नाते बिनसल्याचे वृत्त समोर आले. सुनिता यांनी नुकताच सांगितलं होतं की, गोविंदा यांच्या सोबत त्यांचे नाते कसे आहे. त्यांनी हे देखील सांगितलं होतं की, त्यांच्यासारखं प्रेम कुणीच करू शकत नाही.