

कांटा लगा फेम शेफाली जरीवालाच्या मृत्यूने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. मृत्यूसमयी तिचे वय 42 होते. अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने सगळ्यानाच धक्का बसला आहे. रात्री अचानक छातीत दुखू लागले आणि दवाखान्यात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या निधनाचे कारण काय होते याचा खुलासा अजून संबंधितांकडून केला गेला नाहीये.
शेफालीने बिग बॉसच्या 13 सीझनमध्ये सहभाग घेतला होता. तिच्या मृत्यूनंतर तिने तिचा सहस्पर्धक सिद्धार्थ शुक्ल याला श्रद्धांजली वाहणारी पोस्ट लिहिली आहे. सिद्धार्थचे निधन 2021 मध्ये झाले होते. कार्डियाक अरेस्टने त्याचे निधन झाले होते.
विशेष म्हणजे शेफालीप्रमाणेच सिद्धार्थचेही निधन वयाच्या 42 व्या वर्षी झाले आहे. अर्थात दोघांच्या मृत्यूचे कारणही तेच आहे. शेफाली आणि सिद्धार्थ बऱ्याच काळ नात्यात होते.
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेफालीने सोशल मिडियावर पोस्ट केली होती. त्यात ती म्हणते, तुझ्या आत्म्याला शांती मिलो मित्रा. मला माहिती आहे तू नक्कीच चांगल्या ठिकाणी असशील. एके दिवशी आपण पुन्हा भेटू.’ शेफालीच्या निधनानंतर ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली.
शेफाली जरीवाला फिटनेसची पुरेपूर काळजी घेत होती. अनेकदा तिने फिटनेसचे फोटो आणि व्हीडियो सोशल मिडियावर शेयर केले होते. तिच्या अकाली जाण्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.