मॉडेल, अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक जाण्याने सोशल मिडियावर दुख आणि आश्चर्याचे वातावरण आहे.तिच्या निधनाचे नेमके कारण समोर आले नाही तरी कार्डियाक अरेस्ट ही प्राथमिक शक्यता बोलून दाखवली जात आहे.शेफालीच्या अचानक जाण्याने पती पराग त्यागीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.परागसोबत शेफालीचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी तिने मीत ब्रदर्स या संगीतकार जोडीतील हरमीत सिंग याच्यासोबत लग्न केले होते.पण हरमितसिंग सोबत तिचे लग्न फार काळ टिकले नाही. चार वर्षातच तिने हरमीतसोबत घटस्फोट घेतला.शेफालीने हरमीतवर घरगुती हिंसेचा आरोप केला होता. बिग बॉस 13 च्या सीझनमध्ये शेफालीने ही गोष्ट शेयर केली.