

मुंबई - क्विझ शो कौन बनेगा करोडपती (KBC) आपला नवा सीझन घेऊन येत आहे. महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा या सीझनमध्ये होस्टच्या रूपात दिसतील. या नव्या अध्यायाची सुरुवात करताना सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने एक नवीन आणि प्रेरणादायक अभियान सुरू केले आहे – जहां अकल है, वहां अकड है’. ११ ऑगस्टपासून सोम ते शुक्र रात्री ९ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर हा शो पाहता येणार आहे.
या सीजनचे होस्टींग अमिताभ बच्चन करत आहेत. सोनी चॅनलेने शोच्या वापसीची पुष्टी केली आहे. एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये अमिताभ दिसत आहेत. व्हिडिओची सुरुआत एका सीनने होते. यामध्ये एक श्रीमंत माणूस एका सेल्समॅनवर ओरडतो. तो म्हणतो की, सेल्समॅनने लंडनहून आणलेले त्यांचे कालीन खराब केलं आहे.
सेल्समॅन त्याचे बोलणे ऐकतो आणि कालीन खराब न झाल्याचे सांगतो. अमिताभ म्हणतात - जहां अकल है, वहां अकड़ है. त्यानंतर सेल्समॅन त्या माणसाला काही पैसे देतो आणि म्हणतो की, हे पैसे गळ्याच्या औषधासाठी घ्या. यावेळी अमिताभ बच्चन फ्रेममध्ये येतात आणि म्हणतात-"जहां अकल है, वहां अकड है''
व्हिडिओच्या शेवटी अमिताभ चित्रपट 'अग्निपथ' विजय दीनानाथ चौहानच्या अंदाजात बोलतात-"11 अगस्त से अपॉइंटमेंट है अपना. क्या बोलता है? अपॉइंटमेंट. इंग्लिश बोलता है"