

Bhuvan Bam debut with Bollywood actress in film Kuku Ki Kundali
मुंबई - YouTuber ते धर्मा प्रोडक्शनसचा हिरो बनण्यासाठी भुवन बाम सज्ज आहे. मोठ्या पडद्यावर तो रोमान्स करताना दिसणार आहे. तो आधीच अनेक सीरीजमध्ये दिसला आहे. आता चित्रपटातून तो बॉलीवूड डेब्यूसाठी तयार आहे. कास्टिंगमध्ये मोठा बदल करत धर्मा प्रोडक्शन्स रोमँटिक कॉमेडी कुकू की कुंडलीमध्ये नवी जोडी लॉन्च करेल. करण जोहरच्या बॅनरअंतर्गत चित्रपटाचे दिग्दर्शन गुंजन सक्सेना 'द कारगिल गर्ल' आणि 'मिस्टर अँड मिसेज माही' फेम शरण शर्मा करणार आहेत.
भुवन बाम प्रसिद्ध युट्यूबर आहे. अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहे. रिपोर्टनुसार, शूटिंग यावर्षाच्या अखेरीस सुरु होईल. तर चित्रपट २०२६ मध्ये रिलीज केला जाईल. भुवन बाम सध्या आगामी वेब सीरीज 'द रिवोल्यूशनरीज' मुळे चर्चेत आहे. सीरीजमध्ये रोहित सराफ, प्रतिभा रांटा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सीरीज पुढील वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाईल. सीरीजमधून भुवन बामचा फर्स्ट लूक रिलीज केला जाईल.
भुवन बामला 'ढिंढोरा', 'ताजा खबर',' ताजा खबर २', 'रफ्ता रफ्ता' वेब सीरीजमध्ये पाहण्यात आलं आहे. त्याचे स्वत:चे यूट्यूब चॅनल आहे. भुवन बामला गायक व्हायचं होतं, पण त्याला यश मिळाले नही. त्याने यू-ट्यूब चॅनेल सुरु केलं. ज्यामध्ये त्याला खूप यश मिळाले. २०१५ मध्ये त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या यू-ट्यूब चॅनलवर तो कॉमेडी व्हिडिओ आणि रोस्टिंग व्हिडिओ शेअर करत होता. अल्पावधीतच भुवन बामचे व्हिडिओज इतके व्हायरल झाले की, तो खूप प्रसिद्ध झाला.