Bhumi Pednekkar | ‘I was finished’ असे का म्हणाली भूमी पेडणेकर? लेडी किलर चित्रपटाबद्दल केले अनेक धक्कादायक खुलासे!

चित्रपटाचे अपूर्ण शूटींग असूनही केला होता प्रदर्शित, खूप वाईट प्रकारे झाला होता फ्लॉप
Bhumi Pednekkar | ‘I was finished’ असे का म्हणाली भूमी पेडणेकर? लेडी किलर चित्रपटाबद्दल केले अनेक धक्कादायक खुलासे!
Published on
Updated on

Bhumi Pednekkar 2023 मध्ये भूमी पेडणेकर व अर्जून कपूर यांची प्रमूख भूमिका असलेल्या द लेडी किलर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मात्र पूर्ण शुट च झाला नव्हता. अपूर्ण असतानाच या चित्रपटाला थिअटरमध्य प्रदर्शित करण्यात आले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डिझार्स्टर झाला होता. अतिशय वाईट बिझनेस केला होता. या चित्रपटात काम करताना भूमि पेडणेकर हिने अतिशय वाईट अनुभव आला असल्याचे एका मुलाखतीत म्हटले. त्‍यावेळी माय लाईफ इज फिनीश अशा शब्दात त्‍या चित्रपटाबद्दल वर्णन केले आहे.

या चित्रपटाबाबत अनेक धक्कादायक खूलासेही भूमिने केले. हा माझा चित्रपट प्रेक्षंकानी स्वीकारला नाही. या चित्रपटाची पहिल्या दिवशी केवळ 293 तिकीटे विकली गेली आणि केवळ 38 हजार इतका बिझनेस झाला होता हे अतिशय वाईट होते. या चित्रपटाची पटकथा संपूर्ण होती पण चित्रपटाचे पूर्ण चित्रिकरणच केले गेले नाही. याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. या चित्रपटाचा शेवट काय झाला, हे प्रेक्षकांना कळलेच नाही कारण महत्त्वाचे सीन शूटच झाले नव्हते. अनेकांनी याला "बॉलीवूडचा सर्वात बेजबाबदार प्रयोग" म्हटले होते.

त्‍यानंतर या चित्रपटाचा 35 टक्के भाग शूटींगच केला गेला नाही. आणि नंतर मला कळाले की चित्रपट आहे तसाच प्रदर्शित केला जाणार आहे हे एकूण मला धक्काच बसला. या पाठिमागील कारणे शोधली असता चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते यांच्यात वाद झाला होता. याचा फटका चित्रपटाला बसला. पण यात कलाकाराचा काय दोष? मी पात्रासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. पण जेव्हा तिला समजले की चित्रपट पूर्ण होणार नाही आणि तसाच प्रदर्शित केला जाईल, तेव्हा मला धक्का बसला.

माझ्या कारकिर्दीतील वाईट काळ

पूढे भूमी म्हणाली हा चित्रपट फ्लॉप गेला व माझ्या कारकिर्दीला चांगलाच फटका बसला. मी आतून खूपच खचलेली होते. मला वाटले की आता पूर्ण संपलेच. आणि पूढे मला कसे सावरता येईल हे मला खरचं त्‍यावेळी कळत नव्हते मनाची द्वीधा अवस्था झाली होती.

माझ्या मनात विचारांची खिचडी झाली होती

त्‍याकाळात मनात विचारांचे काहूर माजले होते. तसेच दोष कोणाला द्यावा हेच कळत नव्हते. कारण चूक कोणाचित नव्हती मी चित्रपट स्वीकारला होता पण निर्मातेही अडचणीत होते. कारण नुकताच कोव्हिड चा काळ गेला होता व अनेक निर्मात्‍यांचे पैसे बुडाले होते. फिल्म इंडस्ट्रिी या काळातून पूर्णपणे सावरली नव्हती. त्‍यामुळे माझी चूक की इतरांची असा गोंधळ मनात उडाला होता असे भूमीने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news