Sai Tamhankar : सईच्या अभिनयाची भूमी पेडणेकरला पडली भुरळ 

सर्ई-भूमी
सर्ई-भूमी

पुढारी ऑऩलाईन डेस्क : २०२४ हे वर्ष सई ताम्हणकरसाठी नक्कीच अभूतपूर्व ठरलं आहे. "श्री देवी प्रसन्न" पासून "भक्षक" पर्यंत तिच्या (Sai Tamhankar) कामाची जादू ती कायम दाखवत राहिली आहे. नुकत्याच रिलीज झालेला भक्षक नेटफ्लिक्सवर नंबर एकवर ट्रेंड झाला. आता तिच्या अभिनयाची भुरळ अभिनेत्री भूमी पेडणेकरला पडली आहे. (Sai Tamhankar )

भूमीने तिच्या सोशल मीडिया स्टोरीमधून सईसोबतचा काम करण्याचा अनुभव शेयर करून तिच्या अभिनयाचं खास कौतुक केलं आहे. नेटफ्लिक्सवर "भक्षक" च्या उत्तुंग यश कमवत असून सोबतीला समीक्षकांच्या प्रशंसा आणि सई ताम्हणकर च्या अभिनयाच्या चर्चा सर्वत्र होत आहे. २०२४ वर्षात दमदार कामाची सुरुवात तिने सुरू ठेवली आहे.

बॉलीवूडमध्ये सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सई चर्चेत आली ती म्हणजे भूमीच्या सोशल मीडिया स्टोरीमुळे भक्षक च अभूतपूर्व यश आणि सईच्या अभिनयाचं कौतुक अजूनही सुरू आहे. सोबतीला तिच्या अभिनयाचं कौतुक भूमीने देखील केलं भूमीला एका फॅनने सईसोबत काम करण्याचा अनुभव विचारला असताना ती म्हणते- "मी सईच्या कामाची नेहमीच फॅन आहे. मी "हंटर" पाहिला आणि तेव्हापासून आजपर्यंत तिच्या अभिनयाची चाहती आहे. तिच्या अभिनयाचा मी खूप इतका आनंद घेतला होता जेव्हा मला पुलकितने सांगितलं सई सुद्धा "भक्षक"चा एक भाग आहे. तेव्हा मी सईसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक होते. तिचा या चित्रपटातला एक भाग माझ्या खूप जवळचा आहे, जेव्हा ती बालिकागृहात प्रवेश करते आणि ज्या पद्धतीने तिने तो सीन केला आहे, तेव्हा तो मला आणि सगळ्यांना भावुक करून जातो. अभिनयातील लालित्य आणि तिचे बोलके डोळे सगळं काही सांगून जातात आणि म्हणून ती अद्भुत अभिनेत्री आहे."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news