

Rajkumar Rao Bhool Chuk Maaf movie Bonus Trailer
मुंबई : अभिनेता राजकुमार राव आणि सुंदर अभिनेत्री वामिका गब्बी हास्याचा डोस घेऊन येताहेत. चित्रपट 'भूल चूक माफ' लवकरच चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा बोनस ट्रेलर रिलीज केला आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बीच्या बहुचर्चित 'भूल चूक माफ' चित्रपटाचे बोनस ट्रेलर आता निर्मात्यांनी रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता राजकुमार राव आपल्या लग्नासाठी तमाम उपाय करताना दिसतोय. तो अजूनही हळदच्या विधीमध्ये अडकलेला दिसतोय.
'भूल चूक माफ' चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी गिफ्ट म्हणून बोनस ट्रेलर लॉन्च केलं आहे. हा ट्रेलर १ मिनिट २१ सेकंदाचा असून या बोनस ट्रेलरची सुरुवात वामिका पासून होते. लग्नासाठी वामिका राजकुमार रावला पळवून नेते. त्यानंतर ट्रेलरमध्ये राजकुमार राव लग्नासाठी अनेक उपाय करताना दिसत आहे. तो सरकारी नोकरी शोधतो, गायीला गूळ रोटी खायला देतो, असे अनेकविध उपाय करताना तो दिसतोय.
ट्रेलरमध्ये दोन दिवसांपासून तो हळद विधीत अडकला आहे. या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाच्या बोनस ट्रेलरमध्ये हास्याचे फवारे उडताना दिसत आहेत.
'भूल चूक माफ' चित्रपटाचा बोनस ट्रेलर आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'रंजन बनाना चाहता है तितली को अपनी पत्नी, पर भसड़ से भरी है उसकी जिंदगी। क्या हल्दी पर ही इसकी कहानी अटकी रहेगी, या आगे भी बढ़ेगी?' पुढे लिहिलंय, 'मनोरंजन, हंसी और सभी भावनाओं से भरपूर सबसे बड़ी पारिवारिक मनोरंजक फिल्म देखें, केवल 4 दिन दूर.'