Ravi Kishan : ‘एवढी गरीबी की 7 स्टार हॉटेलमध्ये खिचडी खातो’, लोक म्हणाले- ‘अशी गरिबी सगळ्यांना मिळो’

रवि किशन यांच्या गरिबीच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Ravi Kishan
Ravi Kishan : ‘एवढी गरीबी की 7 स्टार हॉटेलमध्ये खिचडी खातो’, लोक म्हणाले- ‘अशी गरिबी सगळ्यांना मिळो’file photo
Published on
Updated on

bhojpuri cinema ravi kishan on his poverty struggle says still order khichdi at 7 star hotels netizens troll

पुढारी ऑनलाईन : भोजपुरी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि भाजप खासदार रवि किशन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगितली. त्यांनी आपल्या गरिबीच्या दिवसांबद्दल बोलताना सांगितले की, आजही त्यांच्या मनावर त्या काळाचा इतका प्रभाव आहे की, 7 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतरही ते महागडे पदार्थ ऑर्डर करत नाहीत, तर खिचडीच मागवतात. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही जण म्हणाले, ‘देवाने आम्हालाही अशीच गरीबी द्यावी.’

Ravi Kishan
Ramayana : कागदावर पेंटिंग, मग दागिने तयार! रामानंद सागर यांनी ‘रामायण’मधील राम-सीतेचा लूक असा केला होता खास

रवि किशन अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. त्यांच्या काही वक्तव्यांवरून सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल होतात. काही काळापूर्वी त्यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर मत व्यक्त करताना परीक्षेला ‘नीट अखबार’ असे म्हटले होते. आता त्यांनी आपल्या संघर्ष आणि गरिबीच्या दिवसांची गोष्ट सांगितल्याने पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो

शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना रवि किशन यांनी आपल्या सुरुवातीच्या आयुष्यातील संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, यश मिळाल्यानंतरही त्यांच्या मनातून गरिबीच्या दिवसांच्या आठवणी गेलेल्या नाहीत.

Ravi Kishan
The Glass House : ना भिंती, ना खिडक्या! जंगलाच्या कुशीत अभय देओलचं काचेचं घर, VIDEO पाहून व्हाल थक्क!

रवि किशन म्हणाले की, “गरिबी इतकी आहे की, आजही 7 स्टार हॉटेलमध्ये गेलो तर चांगले जेवण ऑर्डर करत नाही. ते प्रोडक्शनचे असो, स्वतःच्या पैशांचे असो किंवा पक्षाच्या प्रचारासाठी गेलो असलो तरी मी अजूनही खिचडीच ऑर्डर करतो.”

ते पुढे म्हणाले की, “कपडे लॉन्ड्रीला देतानाही मला संकोच वाटतो. मी विचार करतो की मुंबईला, दिल्लीला किंवा गोरखपूरला घरी गेल्यावर कपडे धुवून घेऊ. त्यामुळे गरिबीच्या त्या आठवणी आजही माझ्या मनात आणि माझ्या नसानसांत रुजलेल्या आहेत.”

रवि किशन यांच्या वक्तव्यावर यूजर्सची फिरकी

रवि किशन यांचा हा व्हिडिओ एका यूजरने X वर शेअर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या यूजरने लिहिले, ‘आम्ही गरीबी पाहिली आहे 2.0’.

यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी रवि किशन यांच्या वक्तव्याची मजा घेतली. काही यूजर्सनी तर, “देवाने आम्हालाही अशीच गरीबी द्यावी,” अशा उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या.

रवि किशन यांची किती आहे संपत्ती?

2024 मध्ये गोरखपूर लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, रवि किशन यांच्याकडे सुमारे 43.32 कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती आहे.

त्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 2.49 कोटी रुपये असून, त्यांच्याकडे 14.37 लाख रुपयांचे दागिने आहेत. याशिवाय मुंबई, गोरखपूर आणि जौनपूर येथे त्यांचे फ्लॅट आणि बंगले असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडे सहा गाड्याही आहेत. शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास, रवि किशन यांनी 12वीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news