BBM-6 | 'हे वागणं महाराष्ट्रातल्या कुठल्याच आईला आवडलं नसेल'..रितेश भाऊंचे रुचिताला खडेबोल!

BBM-6 | 'तुम्ही जे वागलात हे महाराष्ट्रातल्या कुठल्याच आईला आवडलं नसेल'..रितेश भाऊंचे रुचिताला खडेबोल!
image bigg boss marathi 6 contestant and host
bigg boss marathi 6 updates pudhari photo
Published on
Updated on
Summary

‘बिग बॉस मराठी 6’ मध्ये घडलेल्या एका वादग्रस्त प्रकारावर रितेश भाऊंनी रुचिताला कडक शब्दांत सुनावले. तिच्या वागण्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत, हे वर्तन महाराष्ट्रातील कोणत्याही आईला आवडणार नाही असे स्पष्ट सांगितले. या घटनेमुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून प्रेक्षकांमध्येही चर्चा रंगली आहे.

Bigg Boss Marathi 6 latest updates news

लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वात दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे. प्रत्येक आठवड्यात काही ना काही वाद, टास्क आणि भावनिक प्रसंगांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. यावेळी मात्र घरात घडलेल्या एका प्रकारामुळे वातावरण चांगलेच तापले.

image bigg boss marathi 6 contestant and host
Battle of Galwan New Song | सलमान-चित्रांगदाच्या नव्या गाण्यात रोमँटिक ट्विस्ट, एका तासात 138,231 व्ह्यूज (व्हिडिओ)

या आठवड्यातील एका टास्कदरम्यान स्पर्धक रुचिताने केलेल्या वक्तव्यावर आणि तिच्या वागण्यावर घरातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. हा मुद्दा थेट ‘वीकेंडच्या भागात’ समोर आला. शोचा होस्ट रितेश देशमुखने या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घेत रुचिताला खडेबोल सुनावले.

रितेश भाऊ म्हणाला, “तुम्ही जे वागलात हे महाराष्ट्रातल्या कुठल्याच आईला आवडलं नसेल.” त्याच्या या वक्तव्यामुळे घरात काही क्षण शांतता पसरली.

image bigg boss marathi 6 contestant and host
O Romeo BO Collection : कमालीची स्टोरी..तृप्ती डिमरी-शाहिद कपूरच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद, ओपनिंग डेचा गल्ला किती?

रितेश भाऊने घेतली रुचिताची शाळा

रितेशने रुचिताला चांगलेच खडसावले. तो म्हणाला-'रुचिता दीपाली यांच्याकडे बघून तुम्ही काय केलंत? आ थूं.. थुंकलात..तुम्ही जे वागलात...हे महाराष्ट्रातल्या कुठल्याच आईला आवडलं नसेल. तुम्हाला हे असले एक्सप्रेशन्स करायचे असतील ना तर भाऊच्या धक्कामध्ये तुम्हाला जागा नाही...आज जा...बंद करा...'

रुचिताने रितेश भाऊला थांबवण्याचा प्रयत्न केला पण रितेशने 'मी बोलतोय' असे म्हणत आपले बोलणे सुरु ठेवलं. पण दुसरीकडे रुचिताच्या एक्सप्रेशनवरून तिला हे न पटणारं होतं, असं वाटलं. बिग बॉसच्या घरात प्रत्येकाने आपल्या शब्दांची आणि कृतीची जबाबदारी घ्यायला हवी. खेळ खेळताना मर्यादा ओलांडू नयेत, असा इशारा त्याने अप्रत्यक्षात दिला.

सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक प्रेक्षकांनी रितेश भाऊंच्या भूमिकेचे समर्थन केले असून, होस्ट म्हणून त्याने योग्य तेच सांगितले, अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर काहींनी मात्र रुचिताचे समर्थन केलं आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये पुढे काय घडणार, रुचिता आपल्या वागण्यात बदल करणार का, आणि घरातील समीकरणे कशी बदलणार, रुचिताला या वागण्याचा परिणाम भोगावा लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news