BB Marathi | जिथं अत्याचार होणार तिथं सूरज उभा राहणार

जिथं अत्याचार होणार तिथं सूरज उभा राहणार
Bigg Boss Marathi New Season Day 26
'बिग बॉस मराठी' दिवस सव्वीसावा Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत. सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गोलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळू लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंत आणि आर्या जाधवला म्हणत आहे,"जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार... बोलत नाहीना म्हणून ते असा गरिबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा..तू नड".

'बिग बॉस' खतरनाक आहेत : अरबाज पटेल

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज पटेल म्हणत आहे, "बिग बॉस' खतरनाक आहेत. कॅप्टनसी बरोबर सुरू होती. इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता. या इंडस्ट्रीत मी नवीन आहे". त्यावर अंकिता म्हणते,"मला प्रामाणिकपणे तुझा खेळ वीक वाटत नाही. मला वैभवचा खेळ वीक वाटतो".

Bigg Boss Marathi New Season Day 26
प्रायव्हेट जेट, कोटींचा बंगला, अफलातून कार कलेक्शन; कोटींच्या संपत्तीचा मालक चिरंजीवी!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news