

‘बटवारा १९४७’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे. सनी देओल आणि प्रिटी झिंटा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात १९४७ मधील भारताच्या फाळणीदरम्यान घडलेल्या दंगली, लाखो लोकांचे स्थलांतर आणि तुटलेल्या कुटुंबांच्या वेदना दाखवण्यात आल्या आहेत. टीझरमधील भावनिक दृश्ये, प्रभावी संवाद आणि त्या काळातील भीषण वास्तवाचे चित्रण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सनी देओल आणि प्रिटी झिंटा यांच्या बहुप्रतीक्षित ‘बटवारा १९४७’ या चित्रपटातून सनी देओलचे रौद्र रुप पाहायला मिळत आहे. बटवारा १९४७ च्या नुकत्याच रिलीज झालेल्या व्हिडिओने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि संवेदनशील घटनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या १९४७ च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे.
व्हिडिओची सुरुवात अस्वस्थ करणाऱ्या वातावरणाने होते. देशाच्या फाळणीमुळे निर्माण झालेली भीती, धार्मिक तणाव आणि दंगलींचे चित्रण अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. अनेक कुटुंबांना आपली घरे सोडून अनोळखी ठिकाणी स्थलांतर करावे लागले, तर अनेकांची आयुष्यभरासाठी ताटातूट झाली. या सर्व घटनांचा भावनिक आणि मानवी पैलू ठळकपणे मांडण्यात आले आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यासोबतच झालेल्या देशाच्या फाळणीची वेदना आणि त्याचा लाखो लोकांच्या आयुष्यावर झालेला परिणाम या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. व्हिडिओची सुरुवात १९४७ मधील ऐतिहासिक घटनांच्या दृश्यांनी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशाची झालेली फाळणी, त्यातून निर्माण झालेली अस्थिरता आणि धार्मिक द्वेषाच्या वातावरणात सामान्य नागरिकांनी भोगलेल्या यातना यांचे प्रभावी चित्रण यात पाहायला मिळते. चित्रपटाच्या कथानकाच्या केंद्रस्थानी असा एक हिरो (सनी देओल) आहे, जो भीती आणि द्वेषाच्या काळातही मानवतेचा मार्ग निवडतो.
या चित्रपटात सनी दोओल, प्रिती जिंटा शिवाय शबाना आजमी, करण देओल, अली फजल आणि अभिमन्यू सिंग यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे, सुमारे तीन दशकांनंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत करण्यात करण्यात आली आहे. संगीत ए आर रहमान, गीतलेखन जावेद अख्तर यांचे आहे. १४ ऑगस्ट २०२६ रोजी, ‘पार्टीशन डे’च्या निमित्ताने जगभरातील चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.