Batwara 1947 release date | विस्कळीत झालेल्या जगात 'बटवारा 1947' येतोय, आमिर खान प्रोडक्शनने जाहीर केली ही महत्वाची माहिती

Batwara 1947 release date | विस्कळीत झालेल्या जगात 'बटवारा 1947' येतोय, आमिर खान प्रोडक्शनने जाहीर केली ही महत्वाची माहिती
Batwara 1947
Batwara 1947 release date out Instagram
Published on
Updated on
Summary

फाळणीच्या वेदना, संघर्ष आणि मानवतेची कहाणी सांगणारा ‘बटवारा 1947’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटातील प्रमुख पात्रांचे पोस्टर्स नुकतेच समोर आले असून, सनी देओल, शबाना आझमी, प्रीती झिंटा, अली फझल आणि करण देओल यांच्या भूमिका विशेष चर्चेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे.

Batwara 1947 release date announced

फाळणीच्या काळातील वेदना, संघर्ष आणि मानवतेचा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडणारा बहुप्रतिक्षित ‘बटवारा 1947’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्सने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची महत्त्वाची माहिती जाहीर करत चित्रपटाची रिलीज डेट निश्चित केली आहे.

बंटवारा 1947 च्या निर्मात्यांनी चित्रपटातील पात्रांचे पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत. ही पात्रे दु:खाच्या, भितीच्या छायेत दडलेली दिसताहेत. तर काही ठिकाणी शक्ती, निरागसता दाखवतात. आमिर खान प्रोडक्शन्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दल महत्त्वाची माहिती दिलीय.

या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात मातृभूमीप्रती असलेले धैर्य आणि दृढनिश्चय दाखवणारी कथा मांडण्यात आलीय. निर्मात्यांनी चित्रपाटीत कुठली पात्रे असतील, याचा खुलासा केलाय. जे त्यांच्या आजूबाजूचे जग कोसळत असतानाही धैर्य आणि आशेचे प्रतीक बनून उभे राहिले.

Batwara 1947
Trisha Krishnan Secret Engagement | एकीकडे थलपती विजय यांचे घटस्फोट प्रकरण, दुसरीकडे त्रिशाच्या हिऱ्याच्या अंगठीची चर्चा! खरंच त्रिशाने गुपचूप उरकला साखरपुडा?

आमिर खान प्रोडक्शनने लिहिलंय- ''विस्कळीत झालेल्या जगात, त्यांची कहाणी धैर्याचा एक दाखला होती. हे सर्व अनुभवलेल्या लोकांना भेटा, बटवारा 1947, 14 ऑगस्टपासून थिएटरमध्‌ये.''

बंटवारा 1947मधील पात्रांचे पोस्टर्स समोर आले आहेत. यामध्ये शबाना आझमी दुर्गावती देवी (माई) यांच्या भूमिकेत, सनी देओल सिकंदर मिर्झा यांच्या भूमिकेत, प्रीती जी. झिंटा हमीदा बेगम यांच्या भूमिकेत, करण देओल जावेद मिर्झा यांच्या भूमिकेत, अली फझल हबीब अन्वर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय अभिमन्यू सिंह याकूब खान यांच्या भूमिकेत दिसत आहेत. ज्यांनी फाळणीच्या कठीण काळातही हार मानली नाही, अशा लोकांची कहाणी हे पोस्टर्सच्या माध्यमातून मांडण्यात आलीय.

Batwara 1947
Alpha Movie Video | आलिया भट्टचा असा रौद्र लूक पाहिला नसेल, बॉबी देओलच्या भूमिकेत खतरनाक ट्विस्ट

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले असून गीतलेखन जावेद अख्तर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news