Trisha Krishnan Secret Engagement | एकीकडे थलपती विजय यांचे घटस्फोट प्रकरण, दुसरीकडे त्रिशाच्या हिऱ्याच्या अंगठीची चर्चा! खरंच त्रिशाने गुपचूप उरकला साखरपुडा?

Trisha Krishnan Secret Engagement | त्रिशा कृष्णनच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत नवी चर्चा; हिऱ्याच्या अंगठीने वेधलं लक्ष
Trisha Krishnan
Trisha Krishnan Secret Engagement rumours Pudhari photo
Published on
Updated on
Summary

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये तिच्या हातातील अंगठी पाहून चाहत्यांमध्ये तिने गुपचूप साखरपुडा केला का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याचवेळी अभिनेता विजयच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विविध बातम्या समोर येत असताना त्रिशाच्या या फोटोने चर्चेला आणखी रंग चढवला आहे. मात्र अभिनेत्री किंवा तिच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही छायाचित्रे आणि व्हिडिओंमुळे तिच्या गुप्त साखरपुड्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या दृश्यांमध्ये त्रिशाच्या हातातील अंगठी आणि गळ्यातील खास पेंडंटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यावरून विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

खरंच तिने साखरपुडा केला आहे का, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्रिशानेही या अफवांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून त्रिशाचे नाव अभिनेता आणि राजकीय नेते थलपथी विजय यांच्याशी जोडले जात आहे. तामिळनाडूच्या निवडणुकांदरम्यान ती विजय यांच्या कुटुंबीयांसोबत दिसल्यानंतर त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना अधिक वेग आला होता. मात्र, त्रिशाने यापूर्वी विजयसोबतचे संबंध "विशेष मैत्री" असे सांगितले होते. त्यामुळे सध्याच्या साखरपुड्याच्या चर्चांचा संबंध विजय यांच्याशी जोडला जात असला तरी त्यास कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Trisha Krishnan
Subodh Bhave-Sai Tamhankar|सई ताम्हणकर वेगळ्या रुपात! सुबोध भावे घेऊन येताहेत 'बोल बोल राणी', झलक पाहाच

त्रिशाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत याआधीही चर्चा झाल्या आहेत. २०१५ मध्ये तिचा चेन्नईतील उद्योजक वरुण मणियन यांच्यासोबत साखरपुडा झाला होता. मात्र, पुढे काही वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे हे नाते विवाहापर्यंत पोहोचू शकले नाही. अभिनय क्षेत्रातील कारकीर्द कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे हे लग्न मोडल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.

दुसरीकडे, विजय थलपती यांचे घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. त्यांची पत्नी संगीता यांनी विजय यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५४ अंतर्गत क्रूररतेचा आरोप केला आहे. संगीता यांनी दाखले केलेल्या याचिकेत विजय यांचे कोणासोबत विवाहबाह्य संबंध होते याचा उल्लेख केला नसला तरी हे प्रकरण अभिनेत्री त्रिशा कृष्णनशी जोडले जात आहे.

Trisha Krishnan
Lagaan actress New Look|'लगान'मधील 'गौरी'चा इतक्या वर्षांनंतर बदललेला लूक पाहिला का? आमिर खानसोबतचा फोटो व्हायरल

त्रिशा करुप्पुमुळेही चर्चेत

त्रिशा अलीकडेच सूर्यासोबत 'करुप्पू' या चित्रपटात झळकली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून जगभरात कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. सध्या तरी त्रिशा कृष्णन किंवा थलपती विजय यांच्याकडून या सर्व चर्चांबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news