Battle of Galwan song|'देशभक्तीचा असाही रंग..' 'बॅटल ऑफ गलवान'चे पहिले गाणे प्रदर्शित, सलमान खानचा जबरदस्त स्वॅग

Salman Khan Matrubhoomi Song | देशभक्तीचा असाही रंग.. 'बॅटल ऑफ गलवान'चे पहिले गाणे प्रदर्शित, सलमान खानचा जबरदस्त स्वॅग
salman khan
Salman Khan Matrubhoomi Song released instagram
Published on
Updated on
Summary

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याने देशभक्तीचा नवा आणि प्रभावी रंग प्रेक्षकांसमोर आणला आहे. सलमान खानचा दमदार लूक, आर्मी लूक आणि गाण्यातील बोल यामुळे हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Salman Khan Battle of Galwan movie Matrubhoomi Song out

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’चे पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. गाण्याचा ट्रेंड एक्स अकाऊंटवर सकाळपासूनच होता. आता प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसतो.

salman khan
Hiran Chatterjee | आमदार, अभिनेत्यानं मुलीच्या वयाच्या मॉडेलशी केलं दुसरं लग्न, स्वत:ची मुलगी म्हणाली- 'बाप म्हणून फेल...'

याआधी चित्रपटाचे टीजर समोर येताच निर्मात्यांनी चित्रपटातील पहिले गाणे 'मातृभूमि' प्रदर्शित केले आहे. देशभक्तीने भरपूर पहिली झलक पाहताच प्रेक्षकांनी कहाणीची भव्यता स्पष्ट केली आहे.

'मातृभूमि'मध्ये सलमान खान एक भारतीय लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह दिसते. गाण्यात दोन मुलांसोबत एक सर्वसामान. पण आनंदी कौटुंबिक जीवन जगताना दाखवण्यात आले आहे. जीवनातील शांत आणि प्रेमळ क्षणांना गलवान खोऱ्यातील तणावपूर्ण युद्ध सीन्सशी ते जोडले गेले आहे. कर्तव्य, प्रेम, त्याग आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळत आहे.

salman khan
Bigg Boss Marathi-6 |'हा Attitude ना घरी ठेवायचा, या घरात नाही' सोनाली राऊतला रितेश भाऊंचे कडवे बोल

हे गाणे संगीतकार हिमेश रेशमियाने संगीतबद्ध केले आहे. अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांचेही काम यामध्ये पाहायला मिळतेय. "मातृभूमी"चे बोल समीर अंजन यांनी लिहिले आहेत सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली सलमा खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अपूर्व लाखिया यांचे दिग्दर्शन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news