Bapya Marathi movie: बाईमाणसाच्या प्रवासाची घुसमट 'बाप्या'

गोष्ट साध्या कोकणातल्या गावात घडणाऱ्या प्रेमकथेची. अन्या (गिरीश कुलकर्णी) त्याचे शैलजा (राजश्री देशपांडे) वर मनापासून प्रेम आहे.
Bapya Marathi movie
Bapya Marathi moviePudhari
Published on
Updated on

अर्धनारी नटेश्वर, श्रीखंडी यांच्यासारख्या लिंगभावापलीकडे जाऊन वावरणारी व्यक्तित्वे आपल्याकडे पुराणकाळापासून अस्तित्वात होती. पण स्वतःच्या मानसिक व सामाजिक ओळखीनुसार लिंग परिवर्तन स्वीकारणाऱ्यांच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या त्याला किंवा तिला मोठ्या सामाजिक बदलांना सामोरे जावे लागते.

केवळ ज्या व्यक्तींनी आपली भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरज म्हणून असे परिवर्तन केले आहे, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना कुठल्या मानसिक, सामाजिक परिस्थितीला सामोरे जावे लागते, यावर केलेले भाष्य म्हणजे बाप्या....चित्रपट.

दिग्दर्शक समीर तिवारी यांनी समाजातील आज ज्वलंत होऊ पाहणारा विषय शांत, संयमितपणे, त्याला हलकी विनोदाची झालर देत, पण कौटुंबिक नात्याचा ओलावा देत सादर केला आहे. गोष्ट साध्या कोकणातल्या गावात घडणाऱ्या प्रेमकथेची. अन्या (गिरीश कुलकर्णी) त्याचे शैलजा (राजश्री देशपांडे) वर मनापासून प्रेम आहे.

Bapya Marathi movie
Mumbai Airport Cocaine Seizure: 13 कोटींचे कोकेन पकडले; महिलेसह दोघांना अटक

शैलजाला या भावना समजत असतात. पण आपल्या अंतरंगात पुरुषत्वाची ऊर्जा आपल्याला साद घालत असल्याची जाणीव असते. त्यामुळे ती लग्नाला तयार नसते. पण कौटुंबिक दबावामुळे ती लग्नाला तयार होते. एका मुलालाही जन्म देते. पण तिथून पुढे चित्रपटाची कथा वेगळे वळण घेते.

शैलजाचा डॉ. शैलेश कसा होतो, अऩ्या आणि शैलजाचे नाते पुढे कोणत्या वळणावर भेटते. यात अन्याची दुसरी बायको, मुलगा या नात्याला कसा प्रतिसाद देतात, हे सगळे मिळून या सामाजिक प्रश्नाचा कसा सामना करतात, या अनुषंगाने कथानकाला जोड देऊन एक गंभीर सामाजिक प्रश्न संयतरित्या, पण प्रभावीपणे मांडण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.

गिरीश कुलकर्णींचा गावचा अन्या फक्कड. राजश्री देशपांडे यांनी शैलजा ते शैलेश या प्रवासाची नाळ चांगली जोडली असली तरी या प्रवासातला त्यांचा सामाजिक संघर्ष अधिक व्यापक असायला हवा. आर्यन मेंगजी याने संज्या भूमिकेत पौगंडावस्थेतील मुलगा आणि आपल्या आईच्या लिंगपरिवर्तनाचे सत्य कळल्यानंतरचा एकल संज्या समंजसरित्या साकारला आहे. बाकी सर्व कलाकारांच्या भूमिका चोख आहेत. गाणीही प्रसंगाला साजेशी आहेत.

Bapya Marathi movie
Mumbai Ahmedabad bullet train: बुलेट ट्रेनसाठी 350 टन वजनाचा कटरहेड जमिनीखाली; प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार

पार्श्वभूमी आणि कथानक कोकणातले असले तरी भाषेचा लहेजा मात्र पकडता आलेला नाही...लिंग परिवर्तनाचा प्रश्न समाजात अधूनमधून डोके वर काढत असतो. लिंग परिवर्तनच्या भाविक, शारीरिक लढायांना सामोरे जाणाऱ्यांवर टीका करणाऱ्या मानसिक प्रवृत्तींनी आणि जे आपल्या नैसर्गिक उर्मींंच्या हाकेला समाजाची पर्वा न करता प्रतिसाद देतात, त्यांनीही आवर्जून पाहावा असा ‌‘बाप्या‌’ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news