Bajrangi Bhaijaan : ‘मुन्नी’ हर्षाली मल्होत्रा हिला मिळाला ‘हा’ पुरस्कार, हर्षाली मल्होत्राचे फोटो व्हायरल

harshaali malhotra
harshaali malhotra

पुढारी ऑनलाईन

'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा हिला 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार' (Bharat Ratna Dr. Ambedkar Award)ने सन्मानित केले आहे. महाराष्ट्र सरकार तर्फे हा प्रतिष्ठित समजला जाणार पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हर्षाली मल्होत्रा हिलाप्रदान करण्यात आला.

तिने सलमान खानसोबत बजरंगी भाईजानमध्ये स्क्रिन शेअर केली होती. यामध्ये तिची मुन्नी ही भूमिका होती. मुन्नी सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असते. ती इन्स्टा रील्सही बनवते.  तिने सोशल मीडियावरून ही माहिती दिलीय. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याचा अभिमान वाटतो.

तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिला याआधीही पुरस्कार मिळाले आहेत. याआधी तिला 'बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट स्क्रीन अवॉर्ड, झी सिने बेस्ट फिमेल डेब्यू ॲवॉर्डही मिळाले आहेत.

'बजरंगी भाईजान'मध्ये क्यूट, सुंदर असणारी मुन्नी सर्वांनाच भावली होती. तिच्या या भूमिकेनंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिला बजरंगी भाईजानसाठी स्क्रीन ॲवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. कुबूल है, लौट आओ तृषा, सावधान इंडिया अशा मालिका, शोमध्ये तिने काम केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news