पुढारी ऑनलाईन डेस्क : मौसम इश्काचा या पहिल्याच ॲक्शन थ्रीलर गाण्याच्या यशानंतर केपी फिल्म्स आणि ८ स्टुडिओ प्रस्तुत 'बहिण लाडकी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं दोन बहिणींच्या प्रेमळ नात्याची कथा मांडणार आहे. हे गाणं अभिनेत्री समृद्धी काळे आणि बालकलाकार निहीरा गाढवे या दोघींवर चित्रीत झालं आहे. प्रसिद्ध गायिका लॅरिसा अल्मेडा हिच्या सुमधूर आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं आहे.
संबंधित बातम्या –
या गाण्याचे दिग्दर्शन आणि संकल्पना किशन पटेल यांनी केली आहे. तर या गाण्याचे बोल समृद्धी पांडे हिने लिहिले आहे. प्रशांत ओहोळ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे छायाचित्रीकरण प्रदीप कुटे यांनी केले आहे. शिवाय कॅरेस डी मॉटे, सोनम शर्मा आणि हर्श पटेल या टीमने गाण्याच्या प्रोडक्शनची कामे सांभाळली.
बहिण लाडकी गाण्याचे दिग्दर्शक किशन पटेल या गाण्याविषयी सांगतात, "बहिण लाडकी गाण्यात दोन सख्ख्या बहिणींच्या प्रेमळ नात्याची कथा यात मांडली आहे. एक लहान बहीण असते आणि एक मोठी बहीण असते. त्यांना आई-वडील नसल्याकारणाने मोठी बहिणीचं लहान बहिणीचा आईप्रमाणे सांभाळ करते. तिला मायेने वाढवते.
जेव्हा मोठ्या बहिणीचं लग्न ठरतं आणि ती जेव्हा सासरी जाते. तेव्हा त्या दोन्हीही बहिणी भावूक होतात. या गाण्यात त्यांच अतूट प्रेम दाखवलं आहे. तसेच आपण आपल्या ख-या आयुष्यात नाती कशा पद्धतीने जपतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बहिण लाडकी हे गाणं आहे."