

धुरंदर एका सुपरहीट गाण्यामुळे तिचे आयुष्य बदलले, पण तिला लाइमलाईट मिळाली आहे पण त्यापाठीमागे तिचा संघर्षही आहे. आज जरी तिच्या कामाचे कौतुक होत असले तरी तिने इथपर्यंत मारलेली मजल सोपी नव्हती तिच्य वजनावर आजही बोलले जाते. तिच्यावर आजही इन्स्टासारख्या माध्यमांतून बॉडी शेमिंग केले जाते. पण या सर्वांवर मात करत तीची वाटचाल सरु आहे. ती आहे शरारत या धुरंदर मधील गाण्याने प्रकाशझोतात आलेली आयेशा खान. धुरंधरमधील शरारत हे गाणे इतके लोकप्रिय झाले की आज इन्स्टावर ते सर्वाधिक काळ ट्रेडिंगमध्ये राहिले आहे या गाण्यात क्रिस्टल डिसूझासोबत तिने स्क्रिन शेअर केली आहे. या गाण्याचे बोल व हुक स्टेप इतक्या पॉप्युलर झाल्या आहेत की अनेकजण यावर ठेका धरतात.
या गाण्याबाबत आयेशाने सांगितले होते की शुटींग दरम्यान तिचे पिरीयडस सुरु होते. पोटात दुखत असताना ही हे गाणे शूट केले होत यावर तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. पण तिला देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे पण एकदा रेप व आजही बलात्काराच्या धमक्या आयेशाला मिळतात जाणून घेऊया तिचा प्रवास
वजनामुळे नाकारले हाते गाणे
आयेशाने आपल्यास प्रवासविषयी सांगितले की तिचे वजन अनेक ठिकाणी आड आले. एका चित्रपटातील गाणे तिला तू जाड आहेस असे म्हणून नाकारले गेले होते. तर आजही वाईट वाईट कंमेट केल्या जातात. तर रेप करण्याच्या धमक्याही येतात. तीने सांगितले की कॉलेजमध्ये असताना, टी सिरीजच्या एका गाण्यातून तिला बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता . या गाण्यात सेकंड रोल म्हणून तिला घेतले होते पण शूटींगच्या आदल्या रात्री तिला सांगितले गेले की अनेकांना तू खूप मोठी दिसतेस त्यामुळे तूला शूट करता येणार नाही
या घटनेने तिला धक्का बसला होता आपल्या शरिराबद्दल लोका वाईट कमेंट करतात हे समजल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती, आपल्याबद्दल कॉन्फिडंसयेण्या साठी खूप वेळ लागला होता. तसेच आजही इन्स्टाग्रामवर वाईट कमेंट येत असतात
मी कोणतेही कपडे घातले तरी होते का?
ती ज्यावेळी इन्स्टाग्रामवर साधा टॉप घालून फोटो टाकला तरी लोक बोलतात, तर कधी स्कर्ट घातला तरी लोकांना आवडत नाही, त्यामुळे इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना हजारवेळा विचार करावा लागतो. कारण अनेक वाईट कमेंट मिळतात.
रेपच्या धमक्या व लहानपनी झालेला लैंगिक अत्याचार
तिला दररोज सोशल मिडीयावरुन रेपच्या धमक्या मिळतात असाही खूलास आयेशा खान हिने केला आहे. अशा बलात्काराच्या धमक्या रोज मिळतात. त्यामुळे हे खूप वेदनादायी आहे. आपल्या आसपास अशा मानसिकतेचे लोक राहतात हे पाहून दुख होते व भितीही वाटते यामुळे मला काही वेळा माझ्याशी काही वाईट होईल. जुन्या आठवणी ताज्या होतात कारण तिने एका ठिकाणी खूलास केला होता की जेव्हा ती केवळ ९ वर्षांची होती, तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. या रेप थ्रेटमुळे तिच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. यासाठी ती थेरपीची मदत घेत असल्याचेही तिने सांगितले आहे.
कसा होता आयेशाचा प्रवास
आयेशाने मुंबईत ज्युनियर आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. तिने 'कसौटी जिंदगी की' आणि 'बालवीर रिटर्न्स' सारख्या मालिकांमध्ये काम केले. रिअॅलिटी शो: 'बिग बॉस १७' मुळे ती घराघरात पोहोचली. मुनव्वर फारुकीसोबतच्या तिच्या वादामुळे ती खूप चर्चेत राहिली होती. तिने २०२२ मध्ये तेलुगु चित्रपट 'मुखचित्रम' मधून पदार्पण केले. 'धुरंधर' चित्रपटातील 'शरारत' गाण्याने तिला बॉलिवूडमध्ये मोठी ओळख मिळवून दिली. नुकतीच ती कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करू २' मध्येही झळकली आहे.