Awarapan 2 Box Office: 6 दिवसांत 100 कोटी पार! ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ‘कॉकटेल 2’लाही टाकलं मागे

Awarapan 2 Box Office Collection Day 6: इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ने अवघ्या 6 दिवसांत 107.50 कोटी रुपयांची कमाई करत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Awarapan 2 Box Office Collection
Awarapan 2 Box Office Collection Pudhari
Published on
Updated on

Awarapan 2 Box Office Collection Day 6: इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दिवसापासूनच त्याच्या कमाईचा वेग कायम आहे. दमदार ओपनिंग आणि पहिल्या वीकेंडमधील मोठ्या कमाईनंतर आता या चित्रपटाने केवळ सहा दिवसांत 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

‘आवारापन 2’ने पहिल्याच दिवशी 22 कोटी रुपयांची कमाई करत जोरदार सुरुवात केली. त्यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आणि त्याने 33.75 कोटी रुपये कमावले. रविवारीही चित्रपटाने चांगली कामगिरी करत 26 कोटी रुपयांची कमाई केली.

वीकेंडनंतर मात्र चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली. सोमवारी ‘आवारापन 2’ने 9.25 कोटी रुपये कमावले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा कमाईत थोडी वाढ झाली आणि चित्रपटाने 9.75 कोटी रुपये कमावले.

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी ‘आवारापन 2’ने 6.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची सहा दिवसांतील एकूण नेट कमाई 107.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

वर्षातील पाचवी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म

बुधवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली तरी ‘आवारापन 2’ने 2026 मधील पहिल्या बुधवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. सहाव्या दिवशी 6.75 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘कॉकटेल 2’ या चित्रपटांच्या पहिल्या बुधवारच्या कमाईला मागे टाकले आहे.

2026 मध्ये पहिल्या बुधवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘धुरंधर 2’ पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने 49 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘बॉर्डर 2’ने 15.04 कोटी रुपये कमावले होते. ‘धमाल 4’ने 6.9 कोटी, तर ‘भूत बंगला’ने 6.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता ‘आवारापन 2’ने 6.75 कोटी रुपयांसह पाचवे स्थान मिळवले आहे. ‘वेलकम टू द जंगल’ची कमाई 6.07 कोटी, तर ‘कॉकटेल 2’ची कमाई 5.46 कोटी रुपये होती.

Awarapan 2 Box Office Collection
Awarapan 2 Song: फक्त 20 मिनिटांत तयार झालं ‘आवारापन 2’मधील हे गाणं; इमरान हाश्मीचा एक फोन अन् झाली कमाल

दुसऱ्या वीकेंडमध्ये कमाई वाढण्याची शक्यता

सध्या वीकडेज सुरू असल्याने ‘आवारापन 2’च्या कमाईत काहीशी घट दिसत आहे. मात्र, पहिल्या वीकेंडला मिळालेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहता दुसऱ्या वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Awarapan 2 Box Office Collection
Iconic Romantic Song: चालत्या गाडीत सुचली एक ओळ... घाईघाईत लिहिलं गाणं; 32 वर्षांनंतरही 'त्या' गाण्याची जादू कायम

चित्रपटाने सहा दिवसांतच 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता त्याचे पुढचे लक्ष्य 150 कोटी रुपयांचा क्लब असू शकते. ‘वेलकम टू द जंगल’च्या 137.93 कोटी रुपयांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकण्याची संधीही ‘आवारापन 2’समोर आहे.

आता दुसऱ्या वीकेंडमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो आणि 150 कोटींचा टप्पा किती लवकर पार करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news