

Tamil Cinema Film Producer AVM Saravanan Death
‘एव्हीएम स्टुडिओ’चे दिग्गज निर्माते सरवनन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्य़ाने सिनेविश्वात शोककळा पसरली. सरवनन हे तमिळ चित्रपटाचे लेजेंडरी निर्माते होते. सरवनन दीर्घकाळ आजारी होते. त्यांनी चेन्नईत गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.
लोक त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली देत आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक चित्रपटांची निर्मिती केलीय. ज्यामध्ये रजनीकांत यांच्या 'शिवाजी द बॉस' देखील समाविष्ट आहे.
त्यांचे वडील एमव्ही मइयप्पन यांनी १९४५ रोजी एव्हीएम स्टुडिओची स्थापना केली होती. चेन्नईतील याच स्टुडिओमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी सेलिब्रिटी, नातेवाई, मित्र, आणि फॅन्सनी गर्दी केली होती. यावेळी साऊथ स्टार सूर्याला अश्रू अनावर झाले तर अंत्यदर्शनासाठी रजनीकांत पोहोचले.
शानदार चित्रपटांचे निर्माते
एवीएम सरवनन यांनी आपल्या करिअरमध्ये नानुम ओरु पेन', 'संसारम अधू मिनसारम', 'मिनसारा कनावु', 'वेट्टाइकरण', 'शिवाजी: द बॉस' यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत पाच दशके चित्रपट बनत राहिले. त्यांचा स्टुडियो ओटीटी प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव आहे आणि जाहिरातींवर देखील काम करतो.