

राज निदिमोरूच्या कुटुंबीयांनी सामंथाचे मनापासून स्वागत केले असून, नणंद शीतलने भावूक पोस्ट शेअर केली आहे. सामंथाच्या साधेपणा व सकारात्मक स्वभावाचे कौतुक करत लिहिलेल्या या पोस्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
samantha ruth prabhu welcome nidimoru family
साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने दिग्दर्शक राज निदिमोरुशी विवाह केला. त्यांचा विवाह होताच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता आणखी एक फोटो वहायरल होताना दिसतोय. हा फोटो आहे निदिमोरु फॅमिलीचा. खास बाब म्हणजे राज निदिमोरू यांची बहिण शीतल निदिमोरुने सामंथाचे खास स्वागत केले. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राज निदिमोऱूचे कुटुंबीय दिसताहेत. हा फोटो सामंथाची नणंद शीतलने शेअर केला आहे. या पोस्टमुळे सामंथा आणि निदिमोरू कुटुंबातील नातेसंबंध अधिकच चर्चेत आले आहे.
शीतलने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
''चंद्रकुंडात शिवपूजा करताना आलेल्या शांत अनुभवाबद्दल भावूक आठवण व्यक्त करण्यात आली आहे. प्रदोषकाळातील त्या क्षणी कृतज्ञतेने शिवलिंगाला आलिंगन देताना मिळालेली अंतःशांती, आणि कुटुंबाभोवती आलेली स्पष्टता जाणवली.
राज आणि सामंथाच्या प्रवासात निर्माण झालेल्या कोमल, सुसंवादाबद्दल अपार समाधान व्यक्त केले आहे. दोघेही ज्या शांततेने, प्रामाणिकपणाने आणि स्थिरपणे पुढे जात आहेत, त्याबद्दल कुटुंबाला अभिमान वाटतो आणि ते त्यांच्यासोबत मनापासून उभे असल्याचे सांगितले आहे. या पवित्र दिवशी एकत्र केलेल्या रितींनी जीवन अतिशय सुंदररीत्या एकसंध होत असल्याची जाणीव झाली. काही नातेसंबंध सहजपणे, शांततेसोबत येतात—याची आठवण करून दिली. तिळाच्या तेलाचे दीप प्रज्वलित करताना एकच प्रार्थना मनात होती. प्रत्येकाला असा प्रेम लाभो, जे इतके शांत, स्थिर आणि योग्य वाटणारे असते.''
१ डिसेंबर रोजी या कपलने सोशल मीडियावर लग्नाचे फोटोज पोस्ट करून सर्वश्रुत केले होते. तामिळनाडूमध्ये ईशा फाउंडेशनद्वारा स्थापित लिंगा भैरवी मंदिरात त्यांचे लग्न झाले. या मंदिराचे संचालन महिला करतात आणि मंदिरातील मुख्य गर्भगृहातील स्थापित असलेल्या प्रतिमची पूजा देखील महिला पुजारी करतात. या मंदिराला मा दुर्गाच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते.