Avdoot Gupte Song On Vidyanand Bapat: पवित्र असला मंगल असला तरीही देश दगडांचा... अवधुत गुप्तेंची बापटगिरी; Video व्हायरल

Avdoot Gupte Song On Vidyanand Bapat
Avdoot Gupte Song On Vidyanand Bapatpudhari
Published on
Updated on

Avdoot Gupte Song On Vidyanand Bapat: मुळचे रत्नागिरीचे मात्र सध्या पुणेकर असलेल्या विद्यानंद बापट यांनी धार्मिक उत्सवावेळी नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासावरून आवाज उठवला होता. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी घालण्यात येणाऱ्या मंडप आणि मिरवणुकीवेळी लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पिकरला विरोध केला होता. बापट यांनी लोकशाही मार्गाने हा विरोध केला होता.

Avdoot Gupte Song On Vidyanand Bapat
Vidyanand Bapat: ‘पोरं नाही ऐकणार’ म्हणत विद्यानंद बापटांचा LED फोटो लावून DJ; ढोल-ताशांच्या गजर, व्हिडिओ होतोय व्हायरल

मात्र त्यांच्या या विरोधाला मंडळाच्या कार्यकर्त्याने अन् गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संतोष चव्हाणने हिंसा करून प्रत्युत्तर दिलं. यानंतर विद्यानंद बापट यांच्या मोहिमेने वेग घेतला असून आता त्यांना समजातील अनेक लोकांकडून पाठिंबा मिळत आहे. यात संगीतकार आणि गायक अवधुत गुप्ते यांनी देखील अनोख्या पद्धतीनं विद्यानंद बापट यांना पाठिंबा दिला.

Avdoot Gupte Song On Vidyanand Bapat
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरणात चव्हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

अवधुत गुप्ते यांनी विद्यानंद बापट यांच्यावर थेट गाणं काढून त्यांना एक प्रकारे हिरो केलं आहे. अवधुत गुप्ते आपल्या गाण्यात म्हणतात की 'स्वच्छ विचार अन्, स्वच्छ वाणीवर, हसणाऱ्या माकडांचा, मंगला असला, पवित्र असला, तरीही देश हा दगडांचा, तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा, विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा'

Avdoot Gupte Song On Vidyanand Bapat
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट नास्तिक कधी झाले? ‘या’ पुस्तकांनी बदललं आयुष्य; स्वतःच सांगितला नास्तिक होण्याचा प्रवास

विद्यानंद बापट यांनी लाऊड स्पिकरविरूद्ध आंदोलन सुरू केल्यानंतर नागपूरसह अनेक जिल्ह्यांनी डीजे बंदी लागू केली आहे. अनेक जिह्यात प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेत राहून डीजे ला परवानगी दिली आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा देखील प्रशासनाने चंग बांधला आहे.

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजेचा दणदणाट कमी करण्यासाठी चर्चा करून मार्ग काढणार मात्र तो दणदणाट बंद करणार असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news