Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरणात चव्हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

'डीजेच्या विरोधात बोलता का?' म्हणत भररस्त्यात केली होती मारहाण
vidyanand bapat attack pune santosh chavan police custody
Published on
Updated on

पुणे : गणेशोत्सव आणि डीजेबाबत वृत्तवाहिनीला मुलाखत देत असलेल्या विद्यानंद बापट यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार टिळक रस्त्यावरील सदाशिव पेठ परिसरात घडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अटक केलेल्या संतोष शंकर चव्हाण (वय ३२, रा. हनुमाननगर, राऊतवाडी, कोथरूड) याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत विद्यानंद सुहास बापट (वय ३७, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ३) सकाळी पावणेबाराच्या सुमारास सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळाजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापट एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आरोपीने त्यांचा रस्ता अडवला. 'तू आमच्या गणेशोत्सवात अडथळा निर्माण करतोस का, डीजेच्या विरोधात बोलतोस का?' असे म्हणत आरोपीने त्यांना मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बापट तेथून निघून जात असतानाही आरोपीने पुन्हा त्यांना अडवून कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून चव्हाण याला गुरुवारी रात्री अटक केली.

vidyanand bapat attack pune santosh chavan police custody
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट नास्तिक कधी झाले? ‘या’ पुस्तकांनी बदललं आयुष्य; स्वतःच सांगितला नास्तिक होण्याचा प्रवास

त्याला न्यायालयात हजर केले असता, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे आणि सरकारी वकील आर. डी. कोरडे यांनी युक्तिवाद केला की, गुन्ह्यामागील नेमका उद्देश काय होता, यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच फिर्यादी आणि आरोपीमध्ये पूर्वी काही वाद होता का, याचा तपास करायचा आहे. चव्हाण याने यापूर्वीही समाजमाध्यमांवर एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केला होता, तसेच त्याच्यावर आधीचे सहा गुन्हे दाखल आहेत. सध्या शहरात उत्सव काळ सुरू असून दहीहंडी व गणेशोत्सव जवळ आला असताना त्याने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी कोथरूड परिसरात राहत असून चार किलोमीटर लांब शहराच्या मध्यवस्तीत येऊन त्याने हा प्रकार केला. त्याला बापट यांच्याबाबत कोणी माहिती पुरवली होती का, याचा सखोल तपास करण्यासाठी चव्हाणला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली.

vidyanand bapat attack pune santosh chavan police custody
Devendra Fadnavis: "त्यांची मराठी ट्रेंडिंग, मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल; पण..." मुख्यमंत्री फडणवीसांचा बापटांना थेट सल्ला

या वेळी बचाव पक्षाचे वकील ॲड. हेमंत भांड पाटील आणि ॲड. खेतराम सोलंकी यांनी चव्हाणच्या पोलिस कोठडीला विरोध केला. आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला आहे, त्याच्या मनात तक्रारदाराविषयी कोणतीही द्वेषभावना नव्हती, आरोपीला नोटीस देऊन सोडता आले असते; केवळ माध्यमांच्या दबावामुळे प्रकरणाला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे, असा युक्तिवाद करत त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली.

vidyanand bapat attack pune santosh chavan police custody
Vdyanand Bapat PC: तुम्ही माझ्यावर का फोकस करताय... मी कोणीच नाही! माझे मुद्दे खोडून काढा; विद्यानंद बापटांचे पुन्हा खुलं आव्हान

चव्हाणवर या कलमांनुसार गुन्हे दाखल

बीएनएस ३५३ (२) (खोटी माहिती/अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणे), १२६ (२) (जाणूनबुजून अडवणूक), २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य/शब्द वापरणे), ११५ (२) (गंभीर दुखापत करणे), ३५१ (२) (धमकी देणे).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news