

Love Story of Ashok Saraf-Nivedita Saraf
मुंबई -मराठी अभिनेते अशोक सराफ यांना लग्न करायचं नव्हतं. लग्नाविषयी विचारलं की ते नाहीच म्हणायचे. तर दुसरीकडे सहकलाकार आणि मराठमोळी अभिनेत्री निवेदिता जोशी यांनी निर्णय घेतला होता की, लग्न करेन तर अशोकशीच, नाही तर करणारचं नाही!..मग या कपलचं अखेर जुळलं कसं? आज ४ जून रोजी अशोक सराफ यांचा वाढदिवस. जाणून गेऊया त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल...
अनेक चित्रपटांतून अशोक सराफ आणि निवेदिता यांनी एव्हरग्रीन जोडी म्हणून काम केलं आहे. प्रेक्षकांना त्यांची जोडी पडद्यावरही आवडली आणि रिअल लाईफमध्येही. पण एकेकाळी अशोल सराफ यांना लग्नचं करायचं नव्हतं.
एका मुलाखतीत सहकलाकार, अभिनेते सचिन पिळगावकर यांवी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. सचिन पिळगावकर म्हणाले की, अशोकला लग्न करण्याची इच्छाच नव्हती. अशोकचा अपघात झाला होता आणि त्यातून त्याला खूप दुखापत झाली होती. त्याची तब्येत ठिक होत होती. पण, त्याला खूप त्रास झाला होता. त्याने काम सुरु केला आणि आपल्या कामात बिझी होता, खूप खुशदेखील होता. पण त्याला लग्न करायचं नव्हतं. मी लग्नासाठी त्याचं मन वळवलं. कारण निवेदिता आपल्या निर्णयावर ठम होती की, तिला अशोकसीच लग्न करायचं होतं. आणि दुसरीकड निवेदिताची आई या लग्नाच्या विरोधात होत्या. आई आणि तिची मावशी या दोघींचं पण मन वळवलं आणि लग्नासाठी होकार मिळवला.
शेवटी २७ जून १९९० ला या दोघांचं लग्न पार पडलं. ही लव्हस्टोरी ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाच्या सेटवर फुलायला लागली होती. अशोक यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईत झाला तर निवेदिता यांचा १९६५ मध्ये. दोघांच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहे. तरीदेखील निवेदिता यांनी प्रेमाखातिर अशोक यांच्याशी लग्नगाठ बांधली
डार्लिंग-डार्लिंग या नाटकाच्या दरम्यान, या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यामध्ये निवेदिता यांच वडील गजन जोशी देखील काम करायचे. अशोक आणि गजन यांच्यात चांगली मैत्री होती. शिवाजी मंदिरात या नाचकाचा प्रयोग असताना तिछे निवेदिता आल्या होत्या. ही माझी मुलगी तुला भेटायला आलीय, अशी ओळख करून दिली. नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवाबनवी, या सारख्या चित्रपटांमध्ये निवेदिता आणि अशोक यांनी एकत्र काम केलं आहे.
काम करताना प्रेम झालं. दोघांच्या वयातील अंतरामुळे निवेदिता यांच्या घरातल्या मंडलींकडून लग्नाला विरोध झाला होता. असं सांगितलं जातं की, निवेदिता यांच्या आईचा आणि मावशीचा लग्नाला विरोध होता. सिनेसृष्टीतील मुलाशी लग्न करू नये, असे त्यांना वाटत होतं. पण अखेर लग्न झालं.
गोव्यातील मंगेशी देवळात दोघांनी लग्नगाठ बांधली. अशोक सराफ यांचे ते कुलदैवत असल्याने दोघांनी तिथेच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव अनिकेत असं आहे.