Ashish Chanchlani-Elli AvrRam | आशीष चंचलानी आणि एली अवरामने दिली प्रेमाची कबुली? एका फोटोने चर्चेला उधाण

Ashish Chanchlani-Elli AvrRam |आशीष चंचलानी आणि एली अवरामची जोडी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे
image of Ashish Chanchlani-Elli AvrRam
Ashish Chanchlani-Elli AvrRam post viral Instagram
Published on
Updated on

मुंबई - लोकप्रिय डिजिटल स्टार्स आशीष चंचलानी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच तो अमेरिकेत झालेल्या ज्युरासिक वर्ल्ड: रीबर्थ च्या प्रीमियरला उपस्थित राहिला होता. त्या कार्यक्रमात स्कारलेट जोहानसन, महरशला अली आणि जोनाथन बेली यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांशीही तो भेटला. विशेष म्हणजे, या भव्य प्रीमियरला उपस्थित राहणारा तो एकमेव भारतीय होता.

आता मात्र आशीष एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आला आहेत. नुकतीच त्याने अभिनेत्री एली अवरामसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

image of Ashish Chanchlani-Elli AvrRam
Amitabh Bachchan | ‘जहां अकल है, वहां अकड है’...अमिताभ बच्चन यांचा KBC शो कधीपासून सुरु होणार?

आखिर आशीषने त्याचे नातं अधिकृत केलं का?

या फोटोसोबत आशीषने दिलेली कॅप्शन आहे – "Finally ❤"

या एका फोटोने सोशल मीडियावर शंका-कुशंका, गॉसिप्स आणि कौतुक यांचा पूर आणला आहे. हे खरोखरच एखाद्या नात्याची सुरुवात आहे की एखाद्या नव्या प्रोजेक्टचा टीझर? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. आशीष चंचलानी सध्या त्यांच्या बहुप्रतीक्षित "एकाकी" या मालिकेच्या रिलीजची तयारी करत आहेत.

image of Ashish Chanchlani-Elli AvrRam
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची रंगतदार गोष्ट, "मुंबई लोकल"चा कलरफुल टीजर लाँच

ही मालिका त्यांच्या पारंपरिक विनोदी कंटेंटटपेक्षा वेगळी आहे, कारण "एकाकी" मध्ये हॉरर आणि कॉमेडी यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. यामध्ये आशीष लेखक, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. विशेष म्हणजे, "एकाकी" हे त्याचे दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news