veteran stage actor Death | 'रामलीला' सुरु असताना अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, 'राजा दशरथ' यांची भूमिका साकारत होता कलाकार

veteran stage actor Death -'रामलीला'मध्ये 'दशरथ' साकारतानाच अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
image of live performance of ramleela
veteran stage actor Death heart attack Instagram
Published on
Updated on

veteran stage actor passed away heart attack

मुंबई - अनेक कलाकार परफॉर्मन्स करताना स्टेजवर निधन पावले आहेत. आता आणखी एक वृत्त समोर आले आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा येथे 'रामलीला'चे सादरीकरण सुरु असताना एक दुर्घटना घडली. मंगळवार रात्री चंबाच्या प्रसिद्ध रामलीलामध्ये ७३ वर्षांचे अमरेश महाजन राजा दशरथ यांची भूमिका साकारत होते.

image of live performance of ramleela
मॉडेल Poonam Pandey ला 'रामलीला' मधून हटवले; एकेकाळी टीम इंडियाच्या विजयावर कपडे उतरवण्याची केली होती घोषणा

चंबामध्ये रामलीलावेळी राजा दशरथ यांचा दरबार भरलेला असतो. यावेळी अमरेश संवाद बोलू लागतात की- "मैं अपनी प्रजा के लिए अपने प्राण तक न्योछावर कर दूंगा..." आणि हा संवाद म्हणताना अचानक ते शेजारी बसलेल्या कलाकाराच्या खांद्यावर झुकतात. यावेळी तिथेच ते आपले प्राण सोडतात. सुरुवातीला कुणाला काहीच समजत नाही. पण, हे दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले आणि व्हायरल झाले.

अमरेश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोरच प्रिय कलाकाराने प्राण सोडल्याने उपस्थित मंडळींना धक्का बसला.

video - Anku Chahar x account वरून साभार

image of live performance of ramleela
71st National Film Awards | आयकॉनिक अभिनेते मोहनलाल 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित

कलाकार अमरेश महाजन मागील ४० वर्षांपासून रामलीलामध्ये राजा दशरथ यांची भूमिका साकारत आले होते. रंगमंचावर त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स, शानदार अभिनय प्रेक्षकांना रुंजी घालायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news