

Apoorva Mukhija Confirm Contestant of Bigg Boss 19
मुंबई : बिग बॉस १९ मध्ये 'द ट्रेटर्स' फेम अपूर्वा मुखीजा एन्ट्री कन्फर्म झाली आहे. स्वत: अभिनेत्रीने एका मुलाखतीत पुष्टी केली आहे. सलमान खानचा फेमस कंट्रोवर्शियल शो 'बिग बॉस १९' चर्चेत आहे. ३ ऑगस्टला हा शो कलर्स टीव्हीवर लॉन्च होईल. शोसाठी निर्माते मोठ्या सेलिब्रिटीजना ॲप्रोच करत आहेत. रिपोर्ट्सनुसर, कृष्णा श्रॉफ ते राम कपूर, ममता कुलकर्णी सह UAE ची पहिली AI Doll Habubu देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री करेल. आता असा दावा केला जात आहे की, 'द ट्रेटर्स' फेम अपूर्वा मुखीजा देखील या शोमध्ये दिसेल. आता 'बिग बॉस १९' मध्ये जाणार असल्याच्या वृत्त्वार खुद्द अपूर्वाने प्रत्क्रिया दिलीय.
अपूर्वा मुखीजाला प्रश्न विचारण्यात आला की, 'कभी यासाठी नाही म्हणायला पाहिजे. हो जर चांगले पैसे मिळत असतील तर का नाही?' बिग बॉसच्या फॅन पेजवरील वृत्तानुसार, अपूर्वाी सध्या निर्मात्यांसोबत बातचीत सुरु आहे. आणि या सोसाठी ती जवळपास कन्फर्म झालीय.
रिपोर्टनुसार, हा सीजन खूप इंटरेस्टिंग असणार आहे. यावर्षी 'बिग बॉस १९' 'रिवाईंड' होईल. हा शो साडे तीने ते ४ महिने चालणार आहे. याशिवाय शोमध्ये पुन्हा एकदा सीक्रेट रूम इंट्रोड्यूस केलं जाईल. रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस १९' साठी निर्मात्यांनी आतापर्यंत गौरव तनेजा, ममता कुलकर्णी, राज कुंद्रा, फैसल शेख, धीरज धूपर, कृष्णा श्रॉफ, अपूर्वा मुखीजा, मुनमुन दत्ता, खुशी दुबे, राम कपूर, कनिका मान या सेलेब्सना ॲप्रोच केलं गेलं आहे.
शोमध्ये जाणार की नाही, यावर तनुश्री दत्ताने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, 'मला समजत नाही की, या शोसाठी प्रत्येक वर्षी माझं नाव का घेतलं जातं? अनेक लोकांकडून आणि एजन्सींकडून मला कॉल येतात आणि दुसऱ्या प्रोजेक्ट्सच्या मीटिंग्जमध्ये जाण्यासाठीही प्रेरीत केलं जातं. पण तिथे जाऊन समजतं की, हे सर्व बिग बॉस साठी आहे. प्रत्येक वर्षी सीजन सुरू होण्यापूर्वी लोक माझ्या मागे वेड्यासारखे धावतात, त्यांना रोखण्यासाठी मला नंबर ब्लॉक करावा लागतो.'