

मुंबई - हिट टीव्ही मालिका 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल पुन्हा भेटीला येत आहे. १७ वर्षांनंतर एकता कपूरने चाहत्यांसाठी ही खास मालिका दिली आहे. या मालिकेचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'क्योंकी सास भी कभी बहु थी' ही एकता कपूरची टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेली मालिका होती. २००० साली ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली होती. या मालिकेने तब्बल ८ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. याच मालिकेतून तुलसीची भूमिका साकारून अभिनेत्री स्मृती इराणी घराघरात पोहोचली होती. आता १७ वर्षांनंतर मालिकेचा सीक्वल येतोय. त्याची पहिली झलक समोर आलीय.
एकता कपूरने काही महिन्यांपूर्वी हिंट दिली होती की, पुन्हा ही मालिका भेटीला येतेय. तिने इन्स्टाग्रामवर काही पोस्ट केल्या होत्या. त्यावरून चाहते अंदाज लावत होते की, आता ही मालिका परत पहायला मिळणार आहे. आता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'ची पहिली झलक समोर आली आहे. सीक्वलमध्य़े तुलसीची भूमिका काय असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या मालिकेचा एक टीझर समोर आला आहे. याच जुलै महिन्यात 'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिका सुरू होणार असल्याची माहिती आहे.
'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये तुलसीच्या नव्या रुपात स्मृती इराणी दिसत असून त्या घराचा दरवाजा उघडताना दिसताहेत. तुळशीला जलअर्पण करताना दिसत आहेत. प्रोमो मध्ये लिहिलंय- "वेळ आली आहे तुम्हा सगळ्यांना परत भेटण्याची". २९ जुलैपासून रात्री १०.३० वाजता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चे नवीन एपिसोड भेटीला येणार आहेत.