

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'अनुपमा' मालिकेची मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुली आणि ईशा वर्मा यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. ईशा वर्माने रुपाली विरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. ईशाने आरोप केल्यानंतर रुपालीने तिच्याविरोधात ५० कोटी रुपयांचे अवमान केस दाखल केलीय. त्यानंतर ईशाने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलं. (Anupamaa Producer Rajan Shahi and rupali ganguly) आता तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आता 'अनुपमा' मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी रुपालीचे समर्थन केले आहे. 'तुमचे अपार कष्टचं सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत,' असे राजन शाही यांनी म्हटले आहे. (Anupamaa Producer Rajan Shahi and rupali ganguly)
निर्माते राजन शाही यांनी रुपालीसाठी एक नोट लिहिली आहे. रुपालीसोबत एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, 'रुपाली तुमची मेहनत, समर्पण, प्रामाणिकपणा आणि नम्रता डीकेपी/शाही प्रोडक्शन्समध्ये आम्हा सर्वांना प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण प्रेरित करते. 'अनुपमा' तुम्ही इतिहास घडवला आहे. एक असा बेंचमार्क आणि मैलाचा दगड, खूप कमी लोक हे मिळवू शकतात, किंवा बनू शकतात. थू थू थू (नजर लागू नये)'.
राजन शाही यांनी पुढे लिहिलं की, 'आम्ही पडद्यामागे सर्व मेहनत, आव्हाने आणि त्याग पाहिला आहे, त्याचा सामना हसत एक अभिनेत्री म्हणून तुमची नम्रता अनुपमा टीममध्ये आम्ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नेहमीप्रमाणे हसत आणि आत्मविश्वासाने पुढे जा. कारण प्रत्येक दिवसाचे तुमचे अपार कष्टचं सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि नेहमी आम्ही तुमच्या सोबत असेन.'