पाटणा : दोन दिवसांच्या आत ५० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह यांना देण्यात आली आहे. तिला खंडणी दोन वेगवेगळ्या मोबाईल फोनवरून कॉल आणि खंडणी मागत शिवीगाळ केल्याचे सांगण्यात आले. यानंतर अक्षराने आपल्या एका निकटवर्तीयाला लिखित तक्रार दिली असून त्याची नोंद दानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून आता या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत. अक्षरा ही मूळची महाराष्ट्रातील आहे.