Anupamaa | अनुपमामध्ये येणार नवा ट्विस्ट; गोव्यात सुरू आयुष्याचा नवा अध्याय

Anupamaa -अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!
image of anupamaa
Anupamaa tv serial updates instagram
Published on
Updated on
Summary

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘अनुपमा’मध्ये लवकरच नवा ट्विस्ट येणार आहे. कथानकात गोवा ट्रॅक सुरू होणार असून अनुपमाच्या आयुष्यातील नवा अध्याय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या बदलामुळे मालिकेच्या कथेत आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अनुपमा (Anupamaa) ही प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका म्हणून ओळखली जाते. आता या मालिकेच्या कथानकात एक मोठा ट्विस्ट येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

image of anupamaa
Raajneeti Sequel | 'राजनीति'वर मोठं अपडेट, प्रकाश झा यांनी घेतला मोठा निर्णय! म्हणाले, सीक्वल तर करूनच...'

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अनुपमा’ मालिकेत लवकरच गोवा ट्रॅक सुरू होणार आहे. या नव्या ट्रॅकमुळे कथानकात मोठा बदल होणार असून अनुपमाच्या आयुष्यातील एक नवा अध्याय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेतील मुख्य पात्र अनुपमा नवीन वातावरणात आणि नव्या आव्हानांसोबत कशी जुळवून घेते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.

स्टार प्लसवरील सध्या सुरू असलेल्या ट्रॅकमध्ये कथानकात लीप दाखवण्यात आला आहे. अनुपमा आपल्या आयुष्याचा नवा अध्याय गोव्यात सुरू करताना दिसणार आहे. व्हायरल नवीन प्रोमोमध्ये ती गोव्याच्या बीचवर अनुपमा थेपले आणि ढोकळे विकत आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करताना दिसते. तिच्यासोबत एक छोटी मुलगी देखील राहते. त्या छोट्या मुलीसोबत तिचे जिव्हाळ्याचे नातेही निर्माण होते. प्रोमोमध्ये सचिन त्यागी यांची नवी एन्ट्री पाहायला मिळते.

image of anupamaa
Kritika Kamra Wedding Reception | व्हाईट ड्रेसमध्ये कृतिकाचा स्टनिंग लूक, गौरव कपूरसोबत दिले एकापेक्षा एक फोटो पोझ

अनुपमा ही भूमिका अभिनेत्री रुपाली गांगुलीने साकारले आहे. रुपाली यांनी बोलताना सांगितले की, "अनुपमा ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. ती एक अशी स्त्री आहे जी आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरी जात पण तरीही ती ठामपणे उभी राहून पुन्हा नव्याने उभी राहण्याची ताकद दाखवून देते. काही स्त्रियांना अनुपमाच्या आधीच्या टप्प्यातील प्रवास हा आपलासा वाटला तर काहींना पुढे येणारा प्रवास आपला आहे काही असं देखील वाटून जाईल. या सगळ्यात अनुपमाची जिद्द सशक्तपणे उभ राहण्याची ताकद कौतुकास्पद आहे."

"प्रार्थनाच्या मृत्यूनंतर आता लीपनंतर अनुपमा गोव्यात आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करते. तिथे ती देविकाच्या मुलीसोबत राहत आहे आणि नव्या भावना व जबाबदाऱ्यांचा सामना करत आहे. आणखी एक नवी एन्ट्री आणि ट्विस्ट असणार आहेत. "

आता अनुपमाची कथा पुढे कशी सरकते, कोणत्या नव्या पात्राची एन्ट्री होते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news