

पुढारी ऑनलाईन डेस्क - टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुलीवर ईशा वर्मा सातत्याने अनेक प्रकारचे आरोप केले आहेत. आता यावर ॲक्शन घेत रूपालीने ईशावर ५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसोबतच मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या यावर ईशाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
अनुपमा फेम रूपाली गांगुली आणि ईशा वर्मा यांची सध्या चर्चा सुरु आहे. ईशा वर्माचा आरोप आहे की, तिच्या आईला वडिलांपासून दूर करण्यामागे रुपाली आहे. ईशाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट आणि अनेक मुलाखतीत्या माध्यमातून रूपाली गांगुली विरोधात आवाज उठवला आहे. आता यावर अभिनेत्रीने ईशावर लीगल ॲक्शन घेत त्यांच्यावर मानहानीची केस दाखल केली आहे. याशिवाय रूपालीने ५० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणीही केली आहे.
रुपाली आणि ईशामधील हे भांडण तेव्हा समोर आले जेव्हा ईशाची ४ वर्षांपूर्वीची जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल होऊ लागली. त्या व्हिडिओमध्ये ईशाने रुपाली गांगुलीला मानसिक आजारी आणि अपमानास्पद म्हटले होते. ईशाने अभिनेत्रीवर आरोप करत म्हटले आहे की, तिने तिची आई सपना वर्मा हिचा शारीरिक, मानसिक, शाब्दिक आणि भावनिक छळ केला आहे. हे प्रकरण पुन्हा समोर आल्यानंतर अभिनेत्रीने बिग बॉस १७ मध्ये सहभागी झालेली क्राईम ॲडव्होकेट सना रईस खानच्या मदतीने कायदेशीर कारवाई केली आहे.
सना रईसने केस दाखल झाल्यानंतर एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना सांगितले की, रूपालीने ईशावर खोट्या आरोपांविरोधात मानहानी केस दाखल केली आहे. जेदेखील आरोप लावण्यात आले आहेत, ते सर्व बिनबुडाचे आहेत. आणि तिचा उद्देश अभिनेत्रीची प्रतिमा खराब करणे आहे. ईशाने केलेल्या सर्व आरोपांमुळे रूपालीच्या पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफवर परिणाम होत आहे.
ईशा वर्माकडून अद्याप याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यांनी आपले इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे. ईशा ही अश्विन वर्मा आणि त्यांची एक्स वाईफ सपना वर्माची मुलगी आहे. आणि ईशाने आरोप केले आहेत की, रुपालीचे अश्विन यांच्यासोबत अफेअर आहे. त्यामुळेच तिची आई सपना आणि अश्विन वर्मा वेगळे झाले.