

Anu Malik Talk About Amaal Mallik
मुंबई : गायक अमाल मलिकने त्याचा काका म्हणजे वडिलांचे भाऊ अनु मलिक यांच्यावर अनेक आरोप केले होते. यावरूनच अनु मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. अनु मलिक काय म्हणाले? नेमकं प्रकरण काय?
अमाल मलिक सध्या चर्चेत आहे. तो ‘बिग बॉस १९’ मध्ये कंटेस्टेंटमध्ये सहभागी झाला आहे. अमालने आपल्या परिवाराशी नाते तोडल्याचे म्हटले जाते. सोबतच काका अनु मलिक यांच्याविषयी अनेक खुलासे केले आणि त्यांच्यावर आरोप केले होते. पण, तरीदेखील अनु मलिक अमालवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका मुलाखतीत ते अमाल विषयी काय म्हणाले पाहा.
रिपोर्टनुसार, एका बातचीतमध्ये अनु मलिक म्हणतात, ‘डब्बू मलिक आणि अब्बू मलिक माझ्या जीवाचे तुकडे आहेत. जिथेपर्यंत त्या मुलांचा प्रश्न (गायक अमाल आणि अरमान) आहे, ते आमचा जीव आहेत. मुलांच्या रागात देखील प्रेम असतं. आम्ही एक होतो, एक आहोत आणि एकच राहणार.’
जुलै महिन्यात अमाल मलिकने सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये अनु मलिक यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्याचे म्हणणे आहे की, वडील डब्बू मलिकच्या करिअरला अनु मलिक यांनी पुढे जाऊ दिले नाही. सोबतच अमाल म्हणाला, ''जेव्हा मीटू मूव्हमेंट वेळी अनु मलिक यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा मी त्यांना पाठिंबा दिला नव्हता. मी या गोष्टीला घेऊन टेन्शनमध्ये नव्हतो. कारण, मी त्यांना आपलं मानत नाही. हो, पण, त्यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे मला खेद आहे.''
''मला वाटतं की, इतके सगळे लोक त्यांच्या विरोधात बोलत होते तर काही तरी सत्यता असेल. अनु मलिक यांच्या सोबत जेव्हा माझे नात्याची गोष्ट येते, तेव्हा पब्लिक प्लेसमध्ये मी त्यांना सन्मान देत होतो. पण, त्यांच्या विषयी ऐकल्यानंतर आता माझे त्यांच्याशी चांगले नाते नाही. माझा त्यांच्या परिवाराशी कुठलेही नाते नाही. मी अनेक वर्षे त्यांना भेटलो नाही. मी पार्ट्यांमध्ये देखील जात नाही.''