Ankita Walawalkar Vat Purnima | 'कोकण हार्टेड गर्ल'चा सर्वात सुंदर व्हिडिओ, गुलाबी नऊवारीत नटली अंकिता

Ankita Walawalkar Vat Purnima | 'वाह वहिनीसाहेब लईच भारी राव', 'कोकण हार्टेड गर्ल'चा अस्सल मराठी लूकमध्ये सर्वात सुंदर व्हिडिओ
image of Ankita Walawalkar
Ankita Walawalkar Vat Purnima celebration Instagram
Published on
Updated on

Ankita Walawalkar Vat Purnima 2025 video

मुंबई - बिग बॉस मराठी ५ मधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री, सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकरची लग्नानंतरची आजची ही पहिली वटपौर्णिमा आहे. तिने म्युझिक डायरेक्टर कुणाल भगतशी १६ फेब्रुवारीला कोकणात लग्न केले होते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या गावात हा विवाह सोहळा पार पडला होता. या गावात लक्ष्मी-नारायणाचे सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी अंकिता-कुणाल यांची गाठ बांधली गेली होती. आता अंकिताचा वटपौर्णिमेचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.

image of Ankita Walawalkar
Akhil Zainab Reception | महेश बाबू, यश, राम चरण दिग्गजांची हजेरी; नागार्जुनच्या मुलाच्या रिसेप्शनचे फोटो समोर

अंकिता वालावलकरने शेअर केला वटपौर्णिमेचा व्हिडिओ

अंकिता वालावलकरने वटपौर्णिमे निमित्त सुंदर व्हिडिओ शूट केला आहे. अस्सल मराठी लूकमध्ये अंकिताचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. बेबी पिंक कलर नऊवारी पैठणी नेसलीय. त्यावर जरी वर्क केलेले क्रीम कलर ब्लाऊज, लांब मंगळसूत्र, हातात हिरव्यागार बांगड्या, नाकात साजेशी नथ, पायात सुंदर पैंजण, कंबरेला छल्ला, कानात सुंदर वेलांचे झुमके आणि केसांचा सुंदर अंबाडा असा लूक तिने केला आहे.

अंकिताने इन्स्टाग्रामवर काय लिहिलं?

''नवरोबा आज माझ्यासोबत तुझाही उपवास आहे….छान वाटलं मला..खात्री आहे हे सगळं आयुष्यभर निभावशील …. वटपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!''

image of Ankita Walawalkar
अंकिता वालावलकरने ज्या मंदिरात केले लग्न, ते गाव आहे इतकं सुंदर, मग जाताय ना?

वटपौर्णिमेची साडी आहे खास

तिने नेसलेल्या साडीच्या पदरावर सुंदर वडाच्या झाडाची एम्ब्रॉयडरी केलेली दिसते. तिच्या या व्हिडिओवर फॅन्सनी कॉमेंट्सची बरसात केलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news