Anil Kapoor Fitness : वयाच्या ६९ व्या वर्षीही अनिल कपूर आहेत फिट! तुम्हालाही तसं फिट राहायचंय? मग जाणून घ्या त्‍यांच रहस्य

अनिल कपूर केवळ वर्कआउट नव्हे, तर या गोष्टीकडे देतात अधिक लक्ष..
anil kapoor fitness secret
वयाच्या ६९ व्या वर्षीही अनिल कपूर आहेत फिट! तुम्हालाही तसं फिट राहायचंय? मग जाणून घ्या त्‍यांच रहस्य file photo
Published on: 
Updated on: 

anil kapoor fitness secret at age 69 physical workout healthy eating and more important gut health

पुढारी ऑनलाईन : वयाच्या ६९ व्या वर्षीही अनिल कपूर यांची गणना चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक फिट अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांचा फिटनेस पाहून प्रत्येकालाच त्यामागचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. अनिल कपूर यांनी एकदा स्वतः त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगितले होते. विशेष म्हणजे, यामध्ये केवळ शारीरिक व्यायामाचाच समावेश नव्हता, तर...

anil kapoor fitness secret
Cyber Crime : फ्री मूव्हीच्या लिंकवर एक क्लिक, मोबाईल झाला हँग; अन् महिलेच्या खात्यातून ९.९७ लाख लंपास!

अनिल कपूर हे बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत, जे वयाच्या ६९ व्या वर्षीही कमालीचे फिट आहेत. सक्रिय आणि फिटनेसच्या बाबतीत त्यांची बरोबरी करणे कठीण आहे. २०२० मधील त्यांची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी फिटनेस आणि आतड्यांच्या आरोग्याविषयी (गट हेल्थ) चर्चा केली होती. स्वतःला फिट ठेवण्यासाठी मिस्टर कपूर स्ट्रेंथ ट्रेनिंग, सायकलिंग आणि सध्या रनिंगचा आधार घेत आहेत.

अनिल कपूर यांनी सांगितले होते फिटनेसचे रहस्य

टाइम्स बिझनेस अवॉर्ड २०२० मध्ये सूत्रसंचालकांनी अनिल कपूर यांना त्यांच्या फिटनेसचे रहस्य विचारले होते. त्यावर त्यांनी सांगितले की, फिट राहण्यासाठी कोणतेही एकच सूत्र नाही. अशा तीन ते चार गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला फिट राहण्यास मदत करतात. त्यामध्ये सकारात्मक विचारसरणी, स्वतःसोबत आनंदी राहणे आणि आनंदी असणे या गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या आहेत.

यासोबतच त्यांनी फिट राहण्यासाठी आहार आणि पचनाच्या आरोग्याची भूमिकाही स्पष्ट केली होती. अनिल कपूर म्हणाले होते की, प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्या पोटापासून होते. आपण कोणता आहार घेतो, हे अत्यंत महत्त्वाचे असते.

anil kapoor fitness secret
Shani Dev : आता वाईट काळ संपणार! शनीच्या सरळ चालीमुळे 'या' ३ राशींना मिळणार मोठा दिलासा!

पोटाच्या आरोग्यावर दिला होता भर

अनिल कपूर यांनी सांगितले होते की, फिट राहायचे असेल तर पोटाची काळजी घेणे आणि आपण काय खातो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण फिटनेस, आजार किंवा कोणत्याही आरोग्यविषयक समस्यांमागे ७० ते ८० टक्के वाटा आपण घेत असलेल्या आहाराचा असतो.

यासोबतच त्यांनी फिट राहण्याचा एक सोपा मंत्रही सांगितला होता. तुम्ही सकस आणि स्वच्छ आहार घेतला, तर तुम्हाला शरीरातूनही चांगले वाटते. तुमचा श्वास स्वच्छ राहतो आणि चांगली झोपही लागते.

पोटाच्या आरोग्याचा फिटनेसवर होणारा परिणाम

फिट राहण्यासाठी अनिल कपूर पोटाचे आरोग्य आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यावर पूर्ण भर देतात. कारण आपण जे काही खातो, त्याचे पचन होऊन आवश्यक पोषक तत्त्वे आणि ऊर्जेमध्ये रूपांतर होते. यामुळे शरीर सक्रिय राहण्यास आणि शारीरिक हालचाली करण्यास मदत होते. त्यामुळे एकूण फिटनेस आणि शारीरिक आरोग्यासाठी पोटाचे आरोग्य महत्त्वाचे असते.

निरोगी पचनसंस्था शरीरातील अन्नाचे विघटन करते, आवश्यक पोषक तत्त्वे शोषून घेते आणि शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवते. या सर्व गोष्टी सक्रिय जीवनशैलीला आधार देतात. दुसरीकडे, आतड्यांचे आरोग्य बिघडले आणि पचनसंस्था योग्य प्रकारे काम करत नसेल, तर पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परिणामी व्यायाम करणेही कठीण होऊ शकते.

फिट राहण्यासाठी शारीरिक हालचालींवरही भर

आतड्यांच्या आरोग्यासोबतच स्वतःला सक्रिय आणि फिट ठेवण्यासाठी मिस्टर कपूर सायकलिंग, रनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगवर विश्वास ठेवतात. ते आपल्या वर्कआउटचे व्हिडीओही चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.