Ananya Panday Orry Photo: अनन्या पांडेसोबत ओरीचं नेमकं काय सुरु होतं? नको 'त्या' ठिकाणी लावला हात; व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर संताप

Ananya Panday Orry Viral Photo: अभिनेत्री अनन्या पांडे आणि ओरी यांचा पार्टीमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ananya Panday Orry Photo
Ananya Panday Orry PhotoPudhari
Published on: 
Updated on: 

Ananya Panday Orry Viral Photo: सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारा ओरी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी त्याच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या फोटोमध्ये ओरी अभिनेत्री अनन्या पांडेसोबत दिसत आहे. मात्र, फोटोमध्ये ओरीने अनन्याच्या छातीवर हात ठेवल्याचे दिसत असल्याने नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.

ओरी हा बॉलिवूडमधील स्टारकिड्स आणि अनेक सेलिब्रिटींसोबत पार्ट्यांमध्ये दिसत असतो. त्याची हटके स्टाईल आणि सेलिब्रिटींसोबतचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. सोशल मीडियावरही त्याचे मोठे चाहते आहेत. मात्र, यावेळी त्याच्या एका फोटोमुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.

Ananya Panday Orry Viral Photo
Ananya Panday Orry Viral PhotoPudhari
Ananya Panday Orry Photo
GTA 6 Earnings: रचला इतिहास! GTA 6ने पहिल्या दिवशी किती कोटी कमावले? Spider-Man, Avengers आणि The Odyssey सारखे चित्रपटही पडले मागे

ओरीने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पार्टीमधील काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये तो अभिनेत्री अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. अनन्यासोबत ओरीने नेहमीच्या हटके अंदाजात पोझ दिली. मात्र, या फोटोमध्ये ओरीचा हात अनन्याच्या छातीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Ananya Panday Orry Photo
Sanket Pathak Video: 'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही'; संकेत पाठकचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल, राजकीय व्यक्तीला दिला थेट इशारा

ओरीवर नेटकऱ्यांचा संताप

अनन्या पांडे आणि ओरीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमधील ओरीची पोझ पाहून अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी ओरीने मर्यादा ओलांडल्याची टीका केली आहे.

एका युजरने कमेंट करत म्हटले, 'अनन्याने हात कसा लावू दिला?' तर दुसऱ्या युजरने ओरीने अनन्याला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचे म्हटले आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर अनन्या पांडे किंवा ओरी यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.