Amruta Khanvilkar : घटस्फोटाच्या अफवांवर अभिनेत्री अमृता खानविलकर आक्रमक; कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

बदनामीकारक अफवांसह दिशाभूल करणारी माहितीबाबत कायदेशीर टीमने जारी केले पत्र
Amruta Khanvilkar Separation Rumors
Amruta Khanvilkar Separation Rumors Pudhari
Published on
Updated on

Amruta Khanvilkar Separation Rumors : पती हिमांशू मल्होत्रासोबत वेगळे राहत असल्याच्या चर्चेवर अभिनेत्री अमृता खानविलकरने कायदेशीर नोटीस जारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता आणि तिचा पती हिमांशू हे गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, अमृता किंवा हिमांशू या दोघांनीही अद्याप विभक्त होण्याबाबत किंवा घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर

अमृता खानविलकर यांच्या कायदेशीर टीमने जारी केलेल्‍या पत्रात नमूद करण्‍यात आले आहे की, काही ऑनलाईन, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कुमारी अमृता खानविलकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आधारहीन, अब्रू नुकसानकारक आणि त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर पसरवला जात आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो, परंतु अमृता खानविलकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधान, अफवा, पडताळणी न केलेले आरोप किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध किंवा शेअर करण्यासाठी या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

Amruta Khanvilkar Separation Rumors
Amruta Khanvilkar|'त्या दिग्दर्शकाने मला चक्क सेटवर ढकलून दिलं...' अमृताने शेअर केला धक्कादायक अनुभव

... तर कायदेशीर कारवाई केली जाणार

बदनामकार मजकूर तयार करणाऱ्या, प्रसिद्ध करणाऱ्या किंवा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध लागू कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा सर्व प्रकारांवर लक्ष ठेवले जात असून त्याची नोंद घेतली जात असल्‍याचेही या पत्रात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

Amruta Khanvilkar Separation Rumors
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर करतेय गाडीतच फोटोशूट! पाहा तिचा नवा लूक

कायदेशीर विभक्‍तीबाबत चर्चा नाही

अमृता आणि हिमांशू हे २०१५ मध्‍ये विवाहबंधनात अडकले होते. सध्या वेगवेगळ्या घरांत राहत असले तरी ते अजूनही संपर्कात आहेत. करिअर प्राधान्ये, आर्थिक कारणे आणि आपापल्या कुटुंबांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे एका सूत्राच्या हवाल्याने नमूद करण्यात आले होते. त्यांच्यात कायदेशीर विभक्त होण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही एका रिपोर्टमध्‍ये म्‍टहलं होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news