Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर करतेय गाडीतच फोटोशूट! पाहा तिचा नवा लूक

मोहन कारंडे

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अमृता खानविलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

नुकताच तिने एक मजेशीर फोटो शेअर केला, ज्यावर तिचे कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे.

'सध्या फोटोज फक्त गाडीतच काढले जातात' या कॅप्शनमधून तिने तिच्या व्यग्र वेळापत्रकाची झलक दिली आहे.

शूटिंग, प्रमोशन आणि इतर कामांमुळे तिचे दिवस धावपळीचे आहेत.

त्यामुळे तिला शांतपणे, निवांतपणे फोटोशूट करायला वेळ मिळत नाहीये. गाडीतील प्रवास हाच तिच्यासाठी 'फोटो-ब्रेक' ठरतोय.

शूटिंगसाठीचा असो वा प्रवासातील, तिचा गाडीतील प्रत्येक फोटो तितकाच स्टायलिश आणि आकर्षक दिसतो.

तिच नैसर्गिक सौंदर्य या फोटोंमधून दिसून येते.

अमृताने हे फोटो शेअर करताच फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अनेकांनी तिच्या बिझी लाईफचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिच्या सौंदर्यावर भाळले आहेत.