

Amitabh Bachchan Bungalow Prateeksha flooded
मुंबई - मुंबईतील संततधारमुळे मेगास्टार यांचा बंगला देखील सुटला नाही. जुहू येथील अमिताभ बच्चन यांचे पहिले निवासस्थान प्रतीक्षा देखील मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहे. एका व्हिडिओमध्ये, मुख्य प्रवेशद्वारातून आणि बंगल्याभोवती पाणी साचलेले दिसले.
अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याजवळ पुराचे पाणी साचले. याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. शोले चित्रपटाच्या यशानंतर बिग बींनी हे घर खरेदी केले होते. सध्या मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि विमान/रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या आहेत. दुसरीकडे प्रतीक्षा बंगल्याभोवती पावसाचे पाणी तुंबून राहिल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. बिग बींच्या प्रतिक्षा बाहेरील रस्त्याचा व्हिडिओ एका मीडिया हाऊसने शेअर केला आहे, ज्यामध्ये पाणी घरात शिरताना दिसत आहे. परिसरात पाणी तुडूंब भरले आहे.
अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, त्यांनी त्यांच्या घराचे नाव स्वत: ठेवलेलं नाही तर ते त्यांच्या वडिलांनी ठेवलं होतं. वडिलांची एक कविता आहे, त्याची एक ओळ आहे..'स्वागत सबके लिए है पर नहीं है किसी के लिए प्रतीक्षा.'
‘प्रतीक्षा’ अमिताभ बच्चन यांचा जुना बंगला आहे, जो जुहूमध्ये आहे. अमिताभ बच्चन आपल्या परिवारासोबत या बंगल्यात राहतात, पालकांच्या निधनानंतर बिग बींनी ‘प्रतीक्षा’ जवळ एक बंगला खरेदी केला, जो ‘जलसा’ नावाने ओळखला जातो.
video- EFAshok Mistry x account वरून साभार