jhund : तुला अशी भूमिका का दिली? आकाश ठोसरशी बोलताना आमिरचा व्हिडिओ व्हायरल

आमिर खान- आकाश ठोसर
आमिर खान- आकाश ठोसर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागराज मंजुळेच्या झुंड या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाह सैराट फेम परश्या अर्थात आकाश ठोसर, रिंकू राजगुरु यांच्याही भूमिका झुंडमध्ये पाहायला मिळतात. या चित्रपटाचं मिस्टर परफेक्टशनिस्ट आमिर खानसाठी स्पेशल स्क्रिनिंग झालं. यावेळचा आमिरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

खुद्द आकाशने आपल्या फेसबूक अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये आमिर खान आणि आकाश ठोसर दोघे आलिंगन देताना दिसताहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य आहे. आमिर आकाशचं भरभरून कौतुक करताना दिसतोय. आकाशने हा व्हिडिओ काल अपलोड केलाय. त्याने या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही दिलीय. त्याने म्हटलंय- One of the best moment of #jhund journey ? Thank you #amirkhan sir for appreciating my work? (आमिर खानकडून माझ्या कामाचं भरभरून कौतुक झालं. माझ्यासाठी सर्वात चांगला क्षण होता. आभारी आहे. झुंडचा प्रवास.)

या स्पेशल स्क्रिनिंगला आमिरने मंजुळेचं खूप कौतुक केलं. आणि आकाशच्या कामाचं विशेष कौतुक केलं. चित्रपट पाहिल्यानंतर आकाशशी बोलताना आमिर म्हणाला- नागराजने ही भूमिका का दिली? I Love You, मला तू आवडतोस. म्हणून तुला अशी निगेटिव्ह भूमिका का दिली? मला तुला असं पाहायचं नव्हतं.

'झुंड' चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेनं केलं आहे. आकाशची या चित्रपटामध्ये निगेटिव्ह भूमिका आहे. ही एका प्रोफेसर (अमिताभ बच्चन) ची कहाणी आहे. गरीब मुलांची फुटबॉल टीम बनवण्याची ही एक प्रेरक कथा आहे.

विजय बरसे यांच्या कहाणीवर आधारित चित्रपट

झुंडची कहाणी 'स्लम सॉकर फाउंडेशन' चे संस्थापक आणि कोच विजय बरसे यांच्या कहाणीवर आधारित आहे. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन विजय बरसे यांच्या व्यक्तीरेखेत असतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news