Zubeen Garg death case | कोण आहे शेखर ज्योती गोस्वामी? जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी एसआयटीने घेतलं ताब्यात

Shekhar Jyoti Goswami Zubeen Garg: जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी एसआयटीने शेखर ज्योति गोस्वामीला घेतलं ताब्यात?
image of Zubeen Garg death case
Zubeen Garg death case Instagram
Published on
Updated on

Zubeen Garg Death Case updates

मुंबई - प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात आसाम सरकार तपास करत आहे. आता एसआयटीने शेखर गोस्वामी नावाच्या संगीतकाराला ताब्यात घेतले आहे. कोण आहे शेखर ज्योती गोस्वामी आणि जुबीन यांच्या मृत्यूशी त्याचे नाव कसे जोडले गेले?

सिंगर जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात आसाम सरकार द्वारा एसआयटी तपास करत आहे. आता तपासात संगीतकार शेखर ज्योती गोस्वामीला ताब्यात घेतलं आहे. शेखर ज्योती गोस्वामीला त्याच दिवशी ताब्यात घेतले होते, ज्यावेळी एसआयटीने नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हल आयोजक श्यामकानु महंत आणि मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांच्या घरांवर छापे टाकले होते. (singer Zubeen Garg news)

image of Zubeen Garg death case
Bigg Boss 19 Tanya Mittal | मृदुलचे बोलणे ऐकून तान्या मित्तलचे अश्रूच थांबेनात! अखेर मागितली माफी

कोण आहे शेखर ज्योति गोस्वामी?

शेखर ज्योती गोस्वामी एक ड्रमर असल्याचे म्हटले जाते. तो सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगवेळी जुबीन गर्ग यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत होते. एका रिपोर्टनुसार, शेखर ज्योती गोस्वामीने स्व्त:ला इन्स्टाग्रामवर बायोमध्ये साऊंड इंजीनियर, संगीत निर्माता, अरेंजर, संगीतकार, कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर म्हटलं आहे. त्याला ताब्यात का घेण्यात आलं, याबाबतीची माहिती समोर आलेली नाही.

image of Zubeen Garg death case
Farhan Akhtar 120 Bahadur Teaser Date| फरहानच्या '१२० बहादूर'ची आली टीजर डेट! गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

जुबीनच्या मॅनेजरची अटकेची मागणी

दुसरीकडे श्यामकानु महंत आणि सिद्धार्थ शर्मा यांच्या अटकेची मागमी होत आहे. कारण, ज्यावेळी एसआयटीने विविध ठिकाणी छापेमारी केली, दोघेही त्यावेळी उपस्थित नव्हते. असंही म्हटलं जात आहे की, अनेक लोक जुबीनचे मॅनेजर सिद्धार्थ शर्माच्या घराबाहेर एकत्र जमा झाले होते आणि जेव्हा पोलिस एसआयटी टीम त्याला घरी घेऊन जात होते, तेव्हा दगडफेक झाली होती. आंदोलनकर्त्यांनी त्याची तत्काळ अटकेची मागणी केली आणि त्याला गायक जुबीनच्या मृत्यूला जाबाबदार ठरवलं होतं.

श्यामकानु महंत यांनी जुबीन गर्ग यांना सिंगापूरला आणलं

आसामची स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (एसआयटी) आणि सीआयडी टीमने गुरुवारी श्यामकानु महंत यांच्या गुवाहाटी स्थित घरावर छापा टाकला होता. रिपोर्टनुसार, श्यामकानु महंत सिंगापूरमध्ये आयोजित नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक होते. तेच जुबीन यांना सिंगापूर घेऊन आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news