Alpha Movie | आलिया भट्ट-शर्वरीचा 'अल्फा' यादिवशी प्रदर्शित होणार!

तारीख ठरली! आलिया भट्ट-शर्वरीचा 'अल्फा' यादिवशी येणार
 YRF movie alpha
आलिया भट्ट-शर्वरीचा 'अल्फा' चित्रपट यादिवशी येणार instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - यशराज फिल्म्सने घोषणा केली आहे की, त्यांचा बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन एंटरटेनर अल्फा, जो YRF स्पाय युनिव्हर्समधील पहिली महिला-प्रधान चित्रपट आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्ट या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तर त्यांच्यासोबत YRFची होमग्रोन टॅलेंट आणि स्टार शर्वरीही असणार आहे. दोघीही या बहुप्रतीक्षित स्पायवर्स चित्रपटात सुपर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत, ज्याचे दिग्दर्शन शिव रवैल करत आहेत.

अल्फा हा सणांच्या काळातील एक परिपूर्ण मनोरंजन ठरणार आहे. आदित्य चोप्रा या चित्रपटाला भव्य स्वरुप देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. या चित्रपटात नेत्रदीपक दृश्य आणि रोमांचक अ‍ॅक्शन सीक्वेन्ससह अनेक अनपेक्षित ट्विस्ट्सही असणार आहेत.

 YRF movie alpha
Marathi Film | 'कर्मयोगी आबासाहेब'मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news