Marathi Film | 'कर्मयोगी आबासाहेब'मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व

२५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर लाँच
Marathi Film
कर्मयोगी आबासाहेब चित्रपट लवकरच रिलीज होत आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. स्वर्गीय मा .गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला "कर्मयोगी आबासाहेब" हा चित्रपट २५ ऑक्टोबरला मराठी आणि हिंदी भाषेत जगभर रिलीज होत आहे.

या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

हे असतील मराठी कलाकार

कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news