Allu Arjun : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ला OTT वर तुफान प्रतिसाद; पण हिंदी प्रेक्षकांना…

Allu Arjun : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ला OTT वर तुफान प्रतिसाद; पण हिंदी प्रेक्षकांना…
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन

देशभरात तुफान लोकप्रिय होत असलेला अल्लू अर्जून ( Allu Arjun ) याचा पुष्पा द राईज हा चित्रपट अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर स्ट्रीमिंग करण्यात आला आहे. या चित्रपटाची वाढती लोकप्रियता पाहता अमेझॉनवर देखिल प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहेत. या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर शो करण्या करीता अमेझॉनने एक विशेष ट्रेलर देखिल रिलीज केला आहे. हा चित्रपट अमेझॉनवर तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत उपलब्ध करण्यात आला आहे. पण, हिंदी भाषेतील सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून वाट पहावी लागणार आहे.

साऊथ आयकॉन समजल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुन ( Allu Arjun ) याचा 'पुष्पा' हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी ओसंडून वाहत आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत आहे तसेच निर्बंधांचे नवे नियम सुद्धा लागू करण्यात येत आहेत. तरी देखिल पुष्पा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी वाढतच आहे. या हिंदी भाषेच्या चित्रपटाने तर अगदी वादळ निर्माण केला आहे. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी वाढता प्रतिसाद पहाता अमेझॉनवर हिंदी आवृत्ती येण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार असेच दिसते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुन ( Allu Arjun ) आणि नॅशनल क्रश ठरलेली रश्मिका मंदाना यांच्या या चित्रपटातील कामाचे खूप कौतुक होत आहे. एक साधा लाकूडतोड्या ते चंदन तस्कर करणाऱ्या मोठ्या तस्कारापर्यंतचा नायकाचा प्रवास या या चित्रपटात दाखविण्यात आला. ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटात लार्जर दॅन लाईफ चित्र उभारण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. सुकुमार यांनी या चित्रपटाची कथा लिहली आहे तसेच त्यांनीच चित्रपटाचे दिग्दर्शन देखिल केले आहे.

दक्षिणभारतातसह उत्तरेत देखिल या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचे फॅन फॉलॉइंग देशभरात आहे हेच यावरुन सिद्ध होते.

कोटीच्या कोटी उड्डाने ( Allu Arjun )

'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा गल्ला आताच कमावला आहे. या चित्रपटाच्या नफ्यात अद्याप मोठी वाढ होणे अजून बाकी आहे. तरी देखिल या चित्रपटातील कलाकारांनी कोट्यवधींचे मानधन कमावले आहे. यांचे आकडे पाहून आपले देखिल डोळे विस्फारतील अशीच त्यांची मानधने आहेत.

या चित्रपटासाठी अभिनेता अल्लू अर्जुन याला या चित्रपटासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात तो मुख्य नायक पुष्पा राज याची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना हीने मुख्य नायिका श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिला ८ ते १० कोटींचे मानधन मिळाले आहे.

फक्त मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री नव्हे तर इतर सहाय्यक कलाकरांना देखिल मोठी मानधने मिळाली आहेत. या चित्रपटात अभिनेत्री समांथा ने एक आयटम साँग केले आहे. या एका गाण्यासाठी तीने दीड ते दोन कोटी घेतल्याची माहिती माध्यमातून सांगण्यात आली आहे. या चित्रपटात मल्याळम अभिनेता फहद फासिल याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्याने या चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news